शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या सर्व चुका, कमतरता अन्…”, लग्नानंतरच्या बायकोच्या पहिल्या वाढदिवशी पियुष रानडेची खास पोस्ट, सुरुचीबद्दल व्यक्त होत म्हणाला, “माझ्यावर प्रेम केलं तसं…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 25, 2024 | 12:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Piyush Ranade shared a special post for Suruchi Adarkar's birthday

"माझ्या सर्व चुका, कमतरता अन्...", लग्नानंतरच्या बायकोच्या पहिल्या वाढदिवशी पियुष रानडेची खास पोस्ट, सुरुचीबद्दल व्यक्त होत म्हणाला, "माझ्यावर प्रेम केलं तसं..."

झी मराठी वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर. ‘का रे दुरावा’ मालिकेत सुरुचीने साकारलेली अदिती खानोलकर ही भूमिका चांगलीच गाजली होती. आजही सुरुचीच्या का रे दुरावा मालिकेची व त्या मालिकेमधील भूमिकेची क्रेझ काही कमी झालेली नाही. त्यानंतर तिने काही मालिकांत काम केले. अशातच ती मुकटीच झी मराठी वाहिनीवरीलच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्यानिमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकली.

आपल्या अभिनयाने व निरागस सौंदर्याने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री नुकतीच एका कारणामुळे चर्चेत आली ते म्हणजे तिचं लग्न. सुरुचीने अभिनेता पियुष रानडेबरोबर सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली.  दोघांनी ७ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी थेट विवाहाचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. सुरुची अडारकरने बुधवारी (६ डिसेंबर) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात तिने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नबंधनात अडकल्याचे जाहीर केले. यानंतर दोघेही त्यांच्या सुखी संसारात रमले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Piyush Ranade (@piyush_ranade_official)

आणखी वाचा – “जुन्या साहेबांबरोबर राहून तुतारीतून आवाज काढू का?”, राजकीय परिस्थितीवरील संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेने वेधलं लक्ष, म्हणाला, “मत वाया गेलं…”

अशातच आज सुरुचीचा वाढदिवस आहे आणि याचनिमित्ताने तिला पियुषने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पियुषने तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने असं म्हटलं आहे की, “तुझं प्रेम हा एक प्रकाश आहे, ज्याने मला माझ्या सर्वात गडद क्षणांमध्ये मार्गदर्शन केले आहे. तू माझ्यावर अशा प्रकारे प्रेम केले आहे जे कधीही शक्य होईल असं मला वाटलं नव्हतं. माझ्या सर्व चुका, कमतरता आणि अपूर्णता यांच्यावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद”.

आणखी वाचा – “राजकारण्यांनी पैसे खाल्ले अन्…” सध्याच्या राजकारणावर अवधूत गुप्ते स्पष्टच बोलला, म्हणाला, “ही सामान्य माणसांची चूक…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “आपले नाते ज्याप्रकारे बहरले आहे आणि ते सतत बहरत आहे, त्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बर्थडे गर्ल माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” दरम्यान, पियुषने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये दोघांचे अनेक रोमॅंटिक फोटोस पाहायला मिळत आहेत. तसेच त्याने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच सुरुचीला तिच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छादेखील दिल्या आहेत.  

Tags: marathi entertainment newsPiyush RanadeSuruchi AdarkarSuruchi Adarkar Birthday
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Vandana Gupte Enjoying Goa

नातवासह गोव्यात एन्जॉय करत आहेत वंदना गुप्ते, व्हिडीओ शेअर करत दाखविली झलक, आजीच्या चित्रपटाचं प्रमोशन करतानाही दिसला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.