शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विरोचकाला मारण्यासाठी अद्वैत सज्ज, नेत्राची मदत न घेता विरोचकाला नष्ट करणार, देवी आईची असेल साथ?, मालिकेत पुढे काय घडणार?

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 14, 2024 | 5:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial Adwait will kill Virochka without the help of Netra see the details

विरोचकाला मारण्यासाठी अद्वैत सज्ज, नेत्राची मदत न घेता विरोचकाला नष्ट करणार, देवी आईची असेल साथ?, मालिकेत पुढे काय घडणार?

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत चालली आहे. रहस्यमय कथानकामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. तसेच या मालिकेत एकामागून एक येणारे ट्विस्ट या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहेत. अशातच आता मालिकेत आणखी एक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून या प्रोमोमुळे चाहत्यांची अपेक्षा वाढली आहे.

नुकताच या मालिकेत अस्तिकाचा अंत झाल्याचा ट्विस्ट आला. अस्तिका अद्वैतला मारायचा प्रयत्न करत असताना नेत्रा मध्ये येते व अद्वैतचा जीव वाचवते आणि अस्तिकावर एका धारदार शस्त्राने हल्ला करत ती अस्तिकाचा अंत करते. यानंतर विरोचकही अद्वैतला मारत असताना नेत्रा विरोचकाचाही अंत करत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता अद्वैत व नेत्रा यांचा एक प्रोमो समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – आता अशी दिसतात संकर्षण कऱ्हाडेची जुळी मुलं, लेकाचा व लेकीचा खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “मी यांच्याइतका लहान होतो तेव्हा…”

या नवीन प्रोमोमध्ये अद्वैत नेत्राला आतापर्यंत तू एकटी काढत आली आहेस. पण आता मला एकट्याला लढू देत असं म्हणत आहे. देवी आईच्या कृपेमुळे मला आस्तिकाकडून पंचपिटिकामधील चौथ्या व पाचव्या पेटीची माहिती मिळाली असल्याचे तो तिला सांगतो. त्यामुळे या युद्धात आता मला एकट्याला लढू देत असं म्हणत आहे. मात्र नेत्राला अद्वैतच्या जीवाची काळजी असल्याने ती त्याला एकट्याला लढू देण्यापासून अडवत असल्याचेही यात पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने स्वकमाईने घेतलं नवीन घर, घराला आई-बाबांचे दिले नाव, फोटो शेअर करत म्हणाली, “घर घेणे माझ्यासाठी…”

त्यामुळे आता अद्वैतच्या जीवाला अस्तिका व विरोचकाचा धोका असतानाही अद्वैत या युद्धात एकटा लढू शकेल का? की यात त्याच्या पाठीशी नेत्रा खंबीरपणे उभी असेल? हे पाहणे उतसकुतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर आता आता मालिकेत आणखी नवीन ट्विस्ट काय येणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.       

Tags: marathi entertainment newsmarathi serialSatvya mulichi satavi mulgi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
15 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष व तूळ राशीच्या लोकांना नोकरीत मिळणार बढती, तर मीन व मिथुन राशीच्या लोकांची व्यवसायात होणार भरभराट, जाणून घ्या...  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.