झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत चालली आहे. रहस्यमय कथानकामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. तसेच या मालिकेत एकामागून एक येणारे ट्विस्ट या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहेत. अशातच आता मालिकेत आणखी एक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून या प्रोमोमुळे चाहत्यांची अपेक्षा वाढली आहे.
नुकताच या मालिकेत अस्तिकाचा अंत झाल्याचा ट्विस्ट आला. अस्तिका अद्वैतला मारायचा प्रयत्न करत असताना नेत्रा मध्ये येते व अद्वैतचा जीव वाचवते आणि अस्तिकावर एका धारदार शस्त्राने हल्ला करत ती अस्तिकाचा अंत करते. यानंतर विरोचकही अद्वैतला मारत असताना नेत्रा विरोचकाचाही अंत करत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता अद्वैत व नेत्रा यांचा एक प्रोमो समोर आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये अद्वैत नेत्राला आतापर्यंत तू एकटी काढत आली आहेस. पण आता मला एकट्याला लढू देत असं म्हणत आहे. देवी आईच्या कृपेमुळे मला आस्तिकाकडून पंचपिटिकामधील चौथ्या व पाचव्या पेटीची माहिती मिळाली असल्याचे तो तिला सांगतो. त्यामुळे या युद्धात आता मला एकट्याला लढू देत असं म्हणत आहे. मात्र नेत्राला अद्वैतच्या जीवाची काळजी असल्याने ती त्याला एकट्याला लढू देण्यापासून अडवत असल्याचेही यात पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता अद्वैतच्या जीवाला अस्तिका व विरोचकाचा धोका असतानाही अद्वैत या युद्धात एकटा लढू शकेल का? की यात त्याच्या पाठीशी नेत्रा खंबीरपणे उभी असेल? हे पाहणे उतसकुतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर आता आता मालिकेत आणखी नवीन ट्विस्ट काय येणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.