झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील रहस्यमय कथानकामुळे व आगळ्यावेगळ्या विशबयामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे नुकताच या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पार केला. त्रिनयना व विरोचक यांच्यातील युद्धावर मालिकेचे कथानक अवलंबून आहे. नुकतंच घरातील सदस्यांना अस्तिका कोण व त्रिनयना कोण याचा उलगडा झाला असून यामुळे मालिकच्या कथानकात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. नुकतीच या मालिकेत अस्तिकाची एंट्री झाली असून तिच्याकडे नागमणी असल्याचे दाखवण्यात आले आहे.
आस्तिकाला रुपालीचे सत्य माहित झाले असून तिने हे सत्य अद्वैतलादेखील सांगितले आहे. मात्र आता अस्तिका अद्वैतच्याच प्रेमात पडली आहे. मालिकेत अस्तिका अद्वैतच्या प्रेमात पडली असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. मात्र हे रुपालीला कळताच तिने अस्तिकाला अद्वैतला मारण्यास सांगितले. यावर गेले काही दिवस अस्तिका अद्वैतचा जीव घेणार की नाही? हा प्रश्न पडला होता. मात्र आता मालिकेत आणखी नवीन ट्विस्ट आला आहे, ज्यात अद्वैतचा जीव वाचवताना नेत्राच्या हातून अस्तिकाचं अंत होतो.
नुकताच या ट्विस्टची उत्सुकता निर्माण केलेला एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये अद्वैतचे लक्ष नसताना अस्तिका एका धारदार शस्त्राने अद्वैतचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. मात्र, इतक्यात नेत्रा येते व त्याचा जीव वाचवते आणि या प्रयत्नांत नेत्राच्या हातून अस्तिकाचा अंत होतो. यानंतर नेत्रा विरोचकाच्या समोर जाते व तिला पाहून विरोचकही थक्क होतो. यादरम्यान, नेत्रा एका देवीची रुपात प्रकट होतानादेखील या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता अस्तिकाचा खरंच अंत झाला आहे का? तिच्या जाण्यामुळे आता मालिकेत आणखी नवीन ट्विस्ट काय येणार? यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. त्याचबरोबर अस्तिकाचा अंत झाल्यामुळे आता विरोचक नेत्रा-अद्वैतला मारण्यासाठी कुणाची साथ घेणार? आणि अस्तिकाच्या अंतामुळे याचा नेत्रा-अद्वैत तसेच मालिकेच्या कथानकावरही काय परिणाम होणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.