शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वादळी वारा अन् गारांचा पाऊस तरीही…; वर्ध्यातील प्रथमेश लघाटेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, भारावून गेला, म्हणाला, “पहाटे ५ वाजता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 11, 2024 | 10:50 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prathmesh Laghate Fan Moment

वादळी वारा अन् गारांचा पाऊस तरीही...; वर्ध्यातील प्रथमेश लघाटेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, भारावून गेला, म्हणाला, "पहाटे ५ वाजता..."

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला गायक म्हणजे प्रथमेश लघाटे. प्रथमेशने या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. प्रथमेशच्या गायनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. शास्त्रीय संगीतात प्रथमेश विशेष सक्रिय असलेला पाहायला मिळतो. अनेकदा तो गायनाचे कार्यक्रम घेत चाहत्यांची मनं जिंकतो. प्रथमेशने आजवर त्याच्या गायनसेवेने साऱ्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. प्रथमेशचा खूप मोठा चाहतावर्ग असून या चाहत्यांसाठी प्रथमेशने एक खास आभार पोस्ट शेअर केली आहे. (Prathmesh Laghate Fan Moment)

प्रथमेश गायनसेवेसाठी अनेकदा दौरे करताना दिसतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशातच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रथमेशने खास वर्धा येथे गायनसेवेसाठी हजेरी लावली होती. यावेळी सकाळी ५ वाजता नाव वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या कार्यक्रमाला प्रथमेशच्या अनेक चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान वादळी वारा आणि गारांचा पाऊस असूनही चाहते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आणखी वाचा – ‘आठवी अ’ला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर मराठीत नव्या वेबसीरिजची घोषणा, ‘रस्त्यावरची शाळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

चाहत्यांनी या कार्यक्रमाला दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर प्रथमेशने खास पोस्ट शेअर केली आहे. कार्यक्रमाचा फोटो शेअर करत, “रात्री २ वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडूनही पहाटे ५च्या कार्यक्रमाला वर्धेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. खूप खूप धन्यवाद वर्धेकर रसिक. सर्वांना गुढी पाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणार हे नवीन वर्ष, क्रोधीनाम संवत्सर आपणास सुख, समाधान, मनःशांती, उत्तम आयुरारोग्य व भरभराटीच जावो”, असं म्हणत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : एकीने चिमटा काढला तर दुसरीने मारली कानाखाली, बेडवरच देशपांडे सिस्टर्सची मारामारी, गौतमी जोरजोरात ओरडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

प्रथमेश व त्याची पत्नी मुग्धा वैशंपायन बरेचदा एकत्र गायनसेवेचे कार्य करत असतात. दोघांच्या लग्नामुळे ही जोडी बरीच चर्चेत आलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही प्रथमेश व मुग्धा बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. कलाक्षेत्रातील ही जोडी चाहत्यांची आवडती जोडी आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Tags: entertainmentmarathi singerparthamesh laghatePrathmesh Laghate Fan Moment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
randeep hudda on transformation

“माझा मृत्यूही झाला असता...”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’विषयी बोलताना रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “बेशुद्ध पडायचो आणि...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.