छोट्या पडद्यावरील मालिका या अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतात. आजही असा एक प्रेक्षक वर्ग आहे जो रोज नित्यनियमाने मालिका बघतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. मालिकेतील पात्र, त्याची कथा ही आवडत असल्यास त्यावर मत व्यक्त करतात. मात्र काही नवीन ट्विस्ट किंवा नवीन वळण प्रेक्षकांना आवडले नाही तर त्याबद्दल नाराजीही व्यक्त करतात.
अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका. मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला, जो काही प्रेक्षकांना आवडला, तर काहींना तो आवडला नाही. यामध्ये रुपालीला दक्षिण दिशेकडे कुणीतरी बोलवतानाचे पाहायला मिळाले. यानंतर ती घरी येताच तिला संमोहन शक्ती प्राप्त झाली असल्याचे पाहायला मिळाले, या शक्तीने घरातील केतकी काकुला समोहित करते. याचा एक प्रोमोदेखील आला आहे आणि याच प्रोमोवर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या नवीन प्रोमोमध्ये रुपाली केतकीच्या अंगावर बसली असून ती त्याला संमोहित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच दृश्याची तुलना अनेक प्रेक्षकांनी झपाटलेला या चित्रपटातील तात्या विंचूशी केली आहे. अशा अनेक प्रतिक्रिया या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या प्रोमोखाली “तात्या विंचू आला, विरोचक आहे की तात्याविंचू. तुझा आत्मा माझ्यात माझा आत्मा बाहेर ओम फट्ट स्वाहा:, तात्याविंचूसारखा अभिनय कोणी करू शकत नाही’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – केतकी दारूच्या नशेत, फाल्गुनीला कानाखाली मारल्यानंतर स्वत:ला संपवणार?, देवी आईच्या लेकी संकटात
तर काहींनी “ही मालिका बघून एखाद्याला वेड लागेल, बस्स झाले बंद करा आता भूतगिरीची मालिका, विरोचक केतकीला संमोहित करत आहे मग बाकीचे झोपले आहेत का, ही मालिका बघून ‘असंभव’ची आठवण आली, प्रेक्षक ज्या मालिका रोज न चुकता आवडीने पाहत होते त्या मालिकेची इतकी वाट लावून टाकली की आता ही मालिका पहावीशी वाटत नाही, बंद करा ही मालिका त्रिनयना देवी काहीच करत नाही”. अशा अनेक कमेंट्सद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.