मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

केतकी दारूच्या नशेत, फाल्गुनीला कानाखाली मारल्यानंतर स्वत:ला संपवणार?, देवी आईच्या लेकी संकटात

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 27, 2024 | 1:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya mulichi satavi mulgi serial update new twist virochak being more dengerous

केतकी दारूच्या नशेत, फाल्गुनीला कानाखाली मारल्यानंतर स्वत:ला संपवणार?, देवी आईच्या लेकी संकटात

झी मराठी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दिवसेंदिवस खूपच उत्कंठावर्धक बनत चालली आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्टस या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवत आहेत. त्यामुळे मालिकेत येणारा प्रत्येक नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. मालिकेतील हे नवनवीन ट्विटस प्रेक्षकांना पाहण्याची उत्सुकता असते. अशातच मालिकेत नुकताच विरोचक हा राजाध्यक्षांच्या घरात आल्यामुळे नवीन संकट आले आहे.

विरोचक घरात येण्याने राजाध्यक्ष कुटुंबीयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. विरोचकाला संमोहन शक्तीदेखील मिळाली आहे. ज्याचा विरोचक राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध वापर करत आहे. नुकतंच मालिकेत विरोचकाने केतकी राजाध्यक्षला संमोहित केल्यामुळे ती स्वत:वर चाकू उगारत असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे केतकी दारू नशेत फाल्गुनीच्या कानाखालीही मारते. त्यानंतर आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये रुपाली घरातील प्रत्येकाला डीवचत आहे.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – लेकीची पाठवणी करताना आईला कोसळले रडू, लग्नाला २ महीने पूर्ण होताच तितीक्षा तावडेने शेअर केले भावुक क्षण

या प्रोमोमध्ये रुपाली नेत्रा व इंद्राणी उद्देशून असं म्हणते की, “त्रिनयनाच्या लेकींचं सैन्य हे किती तकलादू आहे. कसं काय लढणार मग तुम्ही या विरोचकाविरुद्ध”. यापुढे ती शेखर राजाध्यक्षला बिनडोक म्हणते, तर अद्वैतला बावळट म्हणते. यापुढे ती फाल्गुनीला मंद चिमणी असं म्हणते तर शेखरला चिडका बिब्बा असं म्हणते.

आणखी वाचा – “माझे बाबा नाहीत तर सासूबाई रडल्या अन्…”, खुशबू तावडेने सांगितला तिच्या लग्नामधील ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “सूनेसाठी डोळ्यात पाणी…”

दरम्यान, आता विरोचक अधिकच ताकदवार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध नेत्रा-इंद्राणीसह राजाध्यक्ष कुटुंबीय कसे लढणार?, नेत्रा स्वत: विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध कशी लढणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.          

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Taarak Mehta Ka Ulta Chashma fame Gurucharan singh missing case Delhi Police received CCTV footage

Video : 'तारक मेहता…' फेम गुरुचरण सिंग दिल्ली विमानतळावरुन बेपत्ता झाल्यानंतर CCTV फुटेज समोर, फिरताना दिसला अन्…; नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.