टेलिव्हीजनवरील ‘साथ निभाना साथिया’ ही मालिका अधिक लोकप्रिय ठरली. या मालिकेमध्ये गोपीबहू या भूमिकेलादेखील प्रेक्षकांचे अधिक प्रेम मिळाले आहे. ही भूमिका देवोलिना भट्टा चार्जीने साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेमदेखील मिळाले होते. सध्या मात्र ती मनोरंजन विश्वापासून दूर असलेली पाहायला मिळत आहे. मात्र सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असून चाहत्यांशीदेखील संवाद साधत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता यामध्ये ती गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना दिसून आली होती. (devoleena bhattacharjee ganpati visrjan dance)
आता सर्वत्र गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करत आहेत. टेलिव्हिजन कलाकार तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीज यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले होते. काहींच्या घरी दीड दिवस, तीन दिवस व सात दिवसांच्या गणपतीचे देखील विसर्जन करत आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचया घरी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. अशातच आता देवोलिनाने देखील घरातील बाप्पाला निरोप दिला आहे.
देवोलिनाने तिच्या सोशल मीडियवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा पती शहनवाज शेख व काही जवळच्या काही व्यक्तींचादेखील सहभाग दिसून आला. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, “गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या”. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. दरम्यान सध्या देवोलिना गरोदर आहे. काही दिवसांपूर्वी तिने गरोदर असल्याचे सांगितले होते. पण आता गरोदरपणात ती गणपती विसर्जनादरम्यान डान्स करताना दिसत आहे. तिच्या बरोबर तिचा पतीदेखील दिसून येत आहे.
शाहनवाज व देवोलिना यांनी गणपती आगमनाच्या तयारीचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता. देवोलिनादेखील तयारीमध्ये मग्न असल्याचे दिसून येत होते. हे करताना तिचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान सध्या देवोलिना अभिनयापासून दूर आहे. तसेच लवकरच तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमनदेखील होणार आहे. बाळाच्या स्वागतासाठी दोघंही तयार असल्याचे दिसून येत आहेत.