‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमधील सततचे वाद, भांडण, हाणामाऱ्या आता आणखी कोणतं वळण गाठणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांनी तुफान राडा घातलेला पाहायला मिळाला. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून हा शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. बरेचदा स्पर्धकांचे वाद, प्रेम, मैत्री, जिव्हाळा हे सारं काही एकाच घरात एका छताखाली पाहायला मिळत आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळी या स्पर्धकाने अल्पावधीतच साऱ्यांचे लक्ष वेधले. (Bigg Boss Marathi Season 5)
सुरुवातीला निक्की अरबाज पटेलबरोबर खेळताना दिसली. मात्र भाऊच्या धक्क्यावर टीम ए ची पोलखोल केल्याने निक्की अरबाज यांच्यात दुरावा आला. त्यांनतर निक्की अभिजीतबरोबर खेळताना दिसली. अभिजीत व निक्कीची चांगली व निखळ मैत्री आहे. दोघेही विरुद्ध टीम मधून खेळत असले तरी त्यांचं नेहमीच पटलं असून दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसले. अभिजीतने निक्कीवर विश्वास ठेवून गेम प्लॅनबद्दल तसेच स्पर्धकांबद्दल चर्चाही केलेली पाहायला मिळाली.
अशातच आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की व अभिजीतच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निक्कीसमोर विश्वासाने अभिजितने वैभव बाबत केलेलं गॉसिप समोर आणलं आहे. निक्कीचं हे वागणं अभिजीतला खटकलेलं पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, वैभव अभिजीतला जाब विचारतो की, “तू माझ्या मागे हिला काय बोलला”. यावर अभिजीत म्हणतो, “अरे बाबा मी तुझ्या मागे नाही बोललो”. यावर निक्की मध्ये पडते, आणि म्हणते, “तू ते नाही म्हटलं का की आम्ही याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने पुन्हा तेच केलं”.
आणखी वाचा – मलायका अरोराच्या वडिलांचे निधन, छतावरुन उडी घेत केली आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
निक्कीचं हे बोलणं ऐकून अभिजीतचा पारा चढतो. अभिजीत निक्कीला म्हणतो, “तुला मित्र समजून मी काही बोलायला गेलो हीच मोठी चूक झाली. याच्यापुढे तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार नाही. असे मित्र आयुष्यात कधी ठेवू नये”, असं म्हणत तिच्याशी असलेलं मैत्रीचं नातं तोडलं.