मराठी ‘बिग बॉस’च्या या पर्वात असणाऱ्या वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सुरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे यांच्यासह अन्य सदस्यांच्या दमदार खेळीने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन सुरु आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांच्या खेळीने आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ११ सदस्यांमध्ये आता अटीतटीची लढाई सुरु झाली आहे. अशातच आता या ११ सदस्यांना टक्कर देण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात प्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एण्ट्री झाली आहे. (Bigg Boss Marathi Season 5)
‘बिग बॉस’च्या घरात यशस्वी सहा आठवडे पूर्ण झाले असून आता या शोचा सातवा आठवडा सुरु झाला आहे. हा आठवडा सुरु झाला असून या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेलाही सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. या आठवड्यात स्पर्धकांना घरात ‘जादुई दिवा’ हा नॉमिनेशन टास्क घेण्यात आला. यावेळी स्पर्धकांना घरातील अन्य सदस्यांचे फोटो गळ्यात घालून त्या स्पर्धकाला नॉमिनेशनपासून वाचावायचं की नाही हा निर्णय घ्यायचा होता.
यावेळी अंकिता वालावलकरच्या गळ्यात जान्हवीचा फोटो, धनंजय पोवारच्या गळ्यात अभिजीत सावंतचा फोटो, वर्षा उसगांवकर यांच्या गळ्यात धनंजयचा फोटो, अभिजीत सावंतच्या गळ्यात आर्या जाधवचा फोटो, आर्या जाधवच्या गळ्यात वैभव चव्हाणचा फोटो, वैभव चव्हाणच्या गळ्यात अंकिता वालावलकरचा फोटो, पॅडी कांबळेच्या गळयात अरबाज पटेलचा फोटो आणि जान्हवी किल्लेकरच्या गळ्यात निक्की तांबोळीचा फोटो, तर निक्की तांबोळीच्या गळ्यात पॅडी कांबळेचा फोटो आणि अरबाज पटेलच्या गळ्यात वर्षा उसगांवकर यांचा फोटो पाहायला मिळत होता.
आणखी वाचा – प्रथमेश-मुग्धा पोहोचले कोकणात, परंपरा जपत एन्जॉय करत आहेत लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, फोटो समोर
‘जादुई दिवा’ हा नॉमिनेशन टास्क खेळताना अनेक ट्विस्ट आलेले पाहायला मिळाले. सदस्यांना बझर वाजल्यावर जादुई दिव्याजवळ सर्वात आधी पोहोचणं गरजेचं होतं. यावेळी स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. यावेळी स्पर्धकांमध्ये भांडण झाल्याचंही पाहायला मिळालं. या टास्कदरम्यान निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर व आर्या जाधव हे सहा सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी घरात कोण राहणार आणि कोणता सदस्य या घराचा निरोप घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.