Malaika Arora Father Died : मलायका अरोराशी संबंधित समोर आलेल्या दु:खद बातमीने साऱ्यांना हादरवून सोडलं आहे. मलायकाच्या वडिलांचे निधन झाले असल्याचं समोर आलं आहे. मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील घराच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीनंतर मलायका अरोराचे कुटुंबीय व जवळच्या नातेवाईकांना खूप मोठा धक्का बसला आहे. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच अभिनेत्रीही पुण्याहून मुंबईला पोहोचली आहे.
सध्या मलायकाच्या वडिलांचे पार्थिव बाबा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या कठीण काळात मलायका अरोराचा माजी पती अरबाज खान तातडीने अभिनेत्रीच्या घरी पोहोचला. अभिनेता मलायकाच्या घराबाहेर पोलिसांशी बोलताना दिसला. याशिवाय घटनास्थळी अर्जुन कपूरही पोहोचला होता.
आणखी वाचा – प्रेग्नेंसीदरम्यान गणपती विसर्जनात बेभान होऊन नाचली देवोलिना भट्टाचार्जी, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका अरोराच्या वडिलांनी सहाव्या मजल्यावरुन गॅलरीतून उडी मारुन आत्महत्या केली. वांद्रे पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, सध्या पोलिसांना घटनास्थळावरुन कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मलायकाचे वडील काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली तेव्हा मलायका अरोरा घरी नव्हती. ती पुण्यात होती. मलायकाला घटनेची माहिती मिळताच ती तात्काळ पुण्याहून मुंबईला रवाना झाली.
नुकताच मलायका घरी पोहोचल्यानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गाडीमधून उतरत ती धावत बिल्डिंगमध्ये शिरताना दिसत आहेत. अभिनेत्रीला यावेळी अश्रूही अनावर झालेले दिसले. या बातमीनंतर अनेक कलाकार देखील अभिनेत्रीच्या घरी पोहोचत आहेत. मलायका अरोराच्या वडिलांची प्रकृती गेल्या वर्षी बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही अभिनेत्री तिच्या आईबरोबर हॉस्पिटलमध्ये दिसली. मात्र, त्यावेळीही त्यांच्या वडिलांचे काय झाले हे समोर आलेले नाही.