सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शेखर राजाध्यक्ष नेत्रा नव्हे तर रुपालीच्याच बाजूने असल्याचं समोर, देवीआईच्या लेकींना हे सत्य कधी समजणार?, बळी गेल्यानंतर काय घडणार?

Saurabh Moreby Saurabh More
मे 7, 2024 | 1:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update new twist

शेखर राजाध्यक्ष नेत्रा नव्हे तर रुपालीच्याच बाजूने असल्याचं समोर, देवीआईच्या लेकींना हे सत्य कधी समजणार?, बळी गेल्यानंतर काय घडणार?

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. मालिकेत नुकताच रुपालीने घरातील काही कुटुंबीयांना संमोहित केल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. रुपालीने घरतील केतकी काकू व फाल्गुनी यांना संमोहित केले असून त्या दोघी रुपालीच्या सांगण्याप्रमाणे वागत आहेत. अशातच रुपालीने आता शेखर राजाध्यक्ष यांनाही तिच्या शक्तीने संमोहित केले आहे.

रुपालीने शेखरला संमोहित करुन त्याला तिच्याविरुद्ध व कुटुंबियांच्या बाजूने राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे शेखरही तिच्या म्हणण्याप्रमाणे कुटुंबियांच्या बाजूने वागत आहे. तसेच नेत्रा, अद्वैत व घरातील इतर सदस्यांना शेखर त्यांच्या बाजूने असल्याचे वाटत आहे. पण प्रत्यक्षात तसे नाही.

अशातच आता रुपालीने तन्मयलाही तिच्या शक्तीने संमोहित केले आहे. तसेच शेखरला त्याच्याबरोबर राहण्यास सांगितले आहे. अशातच मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये शेखर घरातील सर्वांना रुपाली फक्त डोळ्यांत बघून सर्वांना संमोहित करत असल्याचे म्हणत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – आई-बायकोसह लातूरला मतदानासाठी पोहोचला रितेश देशमुख, देशमुखांच्या सूनेने मराठमोळा लूक करत जपले संस्कार, सर्वत्र होतंय कौतुक

या व्हिडीओमध्ये शेखर असं म्हणतो की, “रुपाली तन्मयच्या डोळ्यांत बघून त्याला संमोहित करत होती. पण मी शेवटच्या क्षणी त्याचं लक्ष विचलित करुन त्याला पाठवून दिले. घरात आलेल्या पोलिसांच्याही डोळ्यांत बघून ती त्यांना संमोहित करण्याचा प्रयत्न करत होती. पण मी त्याला सुद्धा वेळीच सावध केले, नाहीतर त्याची अवस्थाही तशीच झाली असती.” असं म्हणतो. यानंतर अद्वैत त्याला “रुपाली फक्त समोरच्याच्या डोळ्यांत बघून त्यांना संमोहित करते?, तुम्हाला याची नक्की खात्री आहे का?” असं विचारतो.

आणखी वाचा – “सुरुवातीच्या काळात…”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, फोटो शेअर करत म्हणाला, “आयुष्य ट्रेनच्या डब्ब्यासारखं…”

यावर शेखरही “मला याबद्दल एक हजार टक्के खात्री आहे” असं म्हणतो. त्यामुळे आता मालिकेत रुपाली अजून कोणाकोणाला तिच्या शक्तीने संमोहित करणार? घरातील आणखी कोण कोण सदस्य रुपालीच्या बाजूने होणार? आणि रुपालीच्या या शक्तीविरुद्ध देवी आईच्या लेकी कशा लढणार/ हे आगामी भागांत पहाया मिळेल. यासाठी मालिकेचे प्रेक्षक उत्सुक आहेत.        

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
govinda on krushna abhishek

"माझी बायको आणि मी…", भाच्याबरोबर गोविंदाचा उभा वाद, अभिनेत्याने या भांडणामागचं सांगितलं कारण, म्हणाला, "कृष्णाच्या मुलांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.