रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वडिलांच्या जाण्याने आईच्या आयुष्यात…”, वडील गेल्यानंतर आईच्या झालेल्या अवस्थेबाबत रितेश देशमुखचं भाष्य, म्हणाला, “ती शेती करते आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 7, 2024 | 2:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riteish Deshmukh talked about his mother doing farming and he also got emotional remembering his father.

"वडिलांच्या जाण्याने आईच्या आयुष्यात...", वडील गेल्यानंतर आईच्या झालेल्या अवस्थेबाबत रितेश देशमुखचं भाष्य, म्हणाला, "ती शेती करते आणि..."

हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे रितेश विलासराव देशमुख. रितेश देशमुख हा स्वर्गीय विलासराव देशमुखांचा सुपुत्र आहे. रितेशने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नसला तरीदेखील त्याचे दोन्ही भाऊ अमित व धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय आहेत. विलासराव देशमुख यांचे निधन होऊन आज इतकी वर्षे झाली असली तरीदेखील त्यांच्या आठवणीत त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हळहळतोच. अशातच मुलगा रितेशही आपल्या वडिलांच्या आठवणीत हळहळला.

रितेशने नुकतीच देवयानी पवार यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने कुटुंब, करिअर याचसह मनोरंजन क्षेत्राविषयी भाष्य केले. या मुलाखतीत रितेशला त्याच्या आईबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रितेशने उत्तर देत असं म्हटलं की, “माझ्या आई या गृहिणी होत्या. त्यांनी उत्तम घर सांभाळलं, त्याचबरोबर आमचं शिक्षणही केलं. आज अमित भैय्या व धीरज हे राजकारणात आहेत आणि मी मनोरंजन क्षेत्रात आहे. पण आमचं शिक्षण होण्यात आमच्या वडिलांपेक्षा आईचा हात अधिक आहे आणि हेच खूप महत्त्वाचे आहे की, तुम्ही तुमचं घर कसं राखत आहात?. त्यावेळी आईने आम्हाला जाणीवपूर्वक इंग्रजी शाळेत घातलं.”

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आणखी वाचा – शेखर राजाध्यक्ष नेत्रा नव्हे तर रुपालीच्याच बाजूने असल्याचं समोर, देवीआईच्या लेकींना हे सत्य कधी समजणार?, बळी गेल्यानंतर काय घडणार?

यापुढे रितेश वडिलांच्या आठवणीत भावुक होत असं म्हणाला की, “आज वडील जाऊन १२ वर्षे झाली. पण या १२ वर्षात सर्वात मोठी पोकळी कुणाच्या आयुष्यात आली असेल तर ती आईंच्या आयुष्यात. कारण मुलांची लग्न झाली. त्यानंतर आम्ही आमच्या कामात व्यस्त झालो. पण ती एकटीच राहिली. तरीसुद्धा या तिच्या त्या वयात त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आता त्या लातूरमध्ये शेती करत आहेत.”

आणखी वाचा – आई-बायकोसह लातूरला मतदानासाठी पोहोचला रितेश देशमुख, देशमुखांच्या सूनेने मराठमोळा लूक करत जपले संस्कार, सर्वत्र होतंय कौतुक         

यापुढे रितेशने असं म्हटलं की, “आई नवनवीन प्रगतशील तंत्रज्ञाचा व प्रयोगाचा वापर करुन लातूरमध्ये शेती करत आहेत आणि याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. या वयात त्या एक स्वतंत्र उद्योजिका आहेत याबद्दलही मला त्यांचा खूपच अभिमान आहे आणि या सर्वात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या या प्रपंचामध्ये त्यांनी मी, अमित भैय्या किंवा धीरज यापैकी कुणा एकाचीही मदत घेतलेली नाही किंवा आमचं मतही विचारलं नाही. त्यांनी त्यांचा त्यांचा निर्णय घेतला आणि त्या आता ते सगळं उत्तम करत आहेत.”   

Tags: marathi actormarathi entertainment newsriteish deshmukhRiteish Deshmukh News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
ankita lokhande on madhuri dixit look

"स्वतःला माधुरी दीक्षित समजू नकोस", हुबेहुब माधुरी दीक्षितसारखी तयार होऊन आली अंकिता लोखंडे, नेटकरी नको नको ते बोलले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.