रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लग्नानंतर स्वतः गाडी चालवत सासरी गेली आरती सिंह, भाऊ म्हणाला, “आमची मुलगी मुलगा घेऊन पळाली आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 26, 2024 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arti singh wedding

Video : लग्नानंतर स्वतः गाडी चालवत सासरी गेली आरती सिंह, भाऊ म्हणाला, "आमची मुलगी मुलगा घेऊन पळाली आणि…"

सध्या मनोरंजन क्षेत्रांमध्ये अभिनेत्री आरती सिंग व दीपक चौहानच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. दोघांच्याही लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. आरतीच्या लग्नासाठी मामा गोविंदा उपस्थित राहिल्याने देखील सर्वत्र चर्चा सुरु झाल्या होत्या. आरतीच्या लेहंग्यापासून ते तिच्या पाठवणीपर्यंत अनेक चर्चा झाल्या. नुकताच तिचा आता पाठवणीचा हटके व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती काहीतरी हटके करताना दिसत आहे. (arti singh wedding)

गेल्या अनेक दिवसांपासून आरती व दीपकच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. काल दोघांचाही विवाह थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नासाठी अभिनेता कृष्णा अभिषेक, कश्मिरा शहा, गोविंदा यांची उपस्थिती होती. लग्नामध्ये आरतीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर दीपकने पांढऱ्या रंगाची शेरवाणी घातली होती. दोघेही वधूवराच्या वेशात खूप साजेसे दिसत होते. मंडपामध्ये जाताना आरतीच्या डोळ्यात अश्रु असलेलेही पाहायला मिळाले. अशातच आता आरतीच्या पाठवणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराजची मराठी मालिकेमध्ये एन्ट्री, सात वर्षांचा लीप आल्यानंतर कथेमध्ये ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Arti Singh (@artisinghkishadi)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरती स्वतः कार चालवताना दिसत आहे. तसेच तिचा पती दीपक हा कारमध्ये तिच्या बाजूला बसलेला दिसत आहे. तेव्हाच तिचा भाऊ कृष्णा आपल्या बहिणीच्या पाठवणीच्यावेळी मस्करी करतानाही दिसत आहे. तो म्हणाला की, “आमची मुलगी मुलगा घेऊन निघून गेली”. हे म्हंटल्यानंतर आजूबाजूची सर्व मंडळी हसू लागली. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “तुम्ही नेहमी आनंदात राहावे हीच आमची सदिच्छा”.

आणखी वाचा – भाचीच्या लग्नात मामाचीचं हवा! अखेर आरती सिंहच्या लग्नात पोहोचला गोविंदा, मीडियासमोर येत म्हणाला, “देवाकडे प्रार्थना करतो की…”

आरतीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर नवरीने काहीतरी वेगळे करुन दाखवले असेही म्हंटले गेले. दरम्यान आरती तिच्या  लग्नाच्या सर्व कार्यक्रमामध्ये खूप सुंदर दिसत होती. तसेच तिने लग्नामध्ये घातलेल्या लाल रंगाच्या लेहंग्यावरुनही तिचे खूप कौतुक करण्यात आले होते. तिचा लेहंगा पाहून नेटरी म्हणाले की, “ही खरी नवरी वाटत आहे”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “इतर अभिनेत्रींप्रमाणे आरतीने फिकट रंग निवडले नाहीत हे पाहून बरं वाटलं”.   

Tags: Arti Singhcar drivingdipak chauhanwedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame actor Gurucharan Singh missing from Delhi airport

'तारक मेहता...' फेम सोढीची भूमिका साकारणारा सुप्रसिद्ध अभिनेता दिल्ली विमानतळावरुन बेपत्ता, वडील म्हणाले, "घरी परतलाच नाही आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.