सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझी बायको आणि मी…”, भाच्याबरोबर गोविंदाचा उभा वाद, अभिनेत्याने या भांडणामागचं सांगितलं कारण, म्हणाला, “कृष्णाच्या मुलांना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 8, 2024 | 11:11 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
govinda on krushna abhishek

"माझी बायको आणि मी...", भाच्याबरोबर गोविंदाचा उभा वाद, अभिनेत्याने या भांडणामागचं सांगितलं कारण, म्हणाला, "कृष्णाच्या मुलांना..."

हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेते गोविंदा सध्या अधिक चर्चेत आहेत. भाची आरती सिंहच्या लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर कुटुंबातील सर्व वाद संपले अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली. याआधी अभिनेता कृष्णा अभिषेक व गोविंदा यांच्यामध्ये वाद असल्याचे अनेकदा ऐकायला मिळाले आहे. पण आरतीच्या लग्नात सगळे वाद-विवाद विसरून दोघेही एकमेकांना भेटताना दिसले. तसेच त्यांच्यामध्ये सगळंकाही सुरळीत असल्याचेदेखील सांगण्यात आले होते. पण या दोघांमध्ये नेमका वाद का झाला? वादाचे नक्की कारण काय? हे आपण आता जाणून घेऊया. (govinda on krushna abhishek)

नुकताच आरती व दीपकचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील सगळे दिग्गज मंडळी उपस्थित होती. पण मामा गोविंदा उपस्थित राहणार की नाही असा प्रश्न काही जणांना पडला होता. पण गोविंदा आपला मुलगा यशवर्धन हे लग्नासाठी उपस्थित राहिले होते. यादरम्याने गोविंदा हे कृष्णावर नाराज का होते? याबद्दलची एक मुलाखत व्हायरल होत आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये कृष्णामुळे खूप नाराज असल्याचे सांगितले आहे.

आणखी वाचा – सात वर्षांनंतर अप्पी-अर्जुन आले एकमेकांसमोर, अमोलला त्याचा बाबा भेटणार का?, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

अभिनेता मनीष पॉलबरोबर झालेल्या एका मुलाखतीमध्ये गोविंदाने मुलाखतीमध्ये सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, “कृष्णाला जेव्हा मुलं झाली तेव्हा मी त्याला भेटायला गेलो होतो. पण तो आपल्या सर्व मुलाखतीमध्ये मामा भेटायला आले नाहीत असे सांगत असतो”.

आणखी वाचा – आई-बायकोसह लातूरला मतदानासाठी पोहोचला रितेश देशमुख, देशमुखांच्या सूनेने मराठमोळा लूक करत जपले संस्कार, सर्वत्र होतंय कौतुक

पुढे ते म्हणाले की, “जेव्हा कृष्णाच्या मुलांचा जन्म झाला तेव्हा मी सुनीताबरोबर त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. मी मुलांना पाहिलं पण त्यांनी जवळ जायला मनाई केली. त्यावरुन कदाचित इन्फेक्शन होण्याची भीती असेल म्हणून जवळ जाऊ देत नसतील असे मीच सुनीताला म्हणालो”. मात्र त्यानंतर अनेकदा कृष्णाने गोविंदा हे मुलांना बघायला आलेच नाहीत असे अनेक मुलाखतीमध्ये सांगितले गेले.

यावेळी कृष्णाचादेखील मामा गोविंदाबद्दलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये त्याने गोविंदाचा दुश्मन म्हणून उल्लेख केला आहे. तो अनेक मुलाखतीमध्ये म्हणाला की, “मला दुश्मनची गरज काय? ते तर आमच्या घरातच आहेत”.

तसेच एकदा कृष्णाने गोविंदाला त्याच्या शोमध्ये बोलावलं होतं. मात्र तिथे न जाता गोविंदा कपिल शर्माच्या शोमध्ये गेला होता. त्यानंतर कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने ट्विट केले. यामध्ये तिने लिहिले की, “काही लोकं पैशासाठी नाचतात”. या सर्व प्रकारानंतर गोविंदा व कृष्णा यांच्यामध्ये खूप दुरावा निर्माण  झाला.    

Tags: fightgovindakrushna abhishek
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Shekhar Suman Joined BJP

कलाकार मंडळींचा भाजपाकडे कल, शेखर सुमन यांचाही पक्षात प्रवेश

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.