बॉलिवूड सिनेसृष्टीत सध्या हिरामंडी वेबसीरिजची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे बॉलिवूड कलाकारही या त्यांच्या हिरामंडी वेबसीरिजमुळे चर्चेत आले आहेत. अशातच हिरामंडीमुळे अभिनेते शेखर सुमन चर्चेत आले आहेत. हिरामंडीमुळे चर्चेत असलेले शेखर सुमन यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शेखर सुमन यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शेखर सुमन यांनी २००९ साली पटना साहिबमधून शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. (Shekhar Suman Joined BJP)
यानंतर आता शेखर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचं समोर आलं आहे. शेखर सुमन यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, शेखर सुमन भविष्यात निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा भाजपात प्रवेश करतानाचा व्हिडीओ त्यांनी एक्सवर शेअर केला आहे.
#WATCH | Actor Shekhar Suman joins BJP at the party headquarters in Delhi pic.twitter.com/Y1izO3Fp6X
— ANI (@ANI) May 7, 2024
आजकाल शेखर सुमन त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हीरामंडी या वेबसीरिजच्या यशाचा आनंद घेत आहे. ही वेबसीरिज या महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. हिरामंडीमधील शेखर सुमनच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत शेखर सुमन यांच्या बरोबर त्याचा मुलगा अध्यान सुमनही दिसणार आहे. याशिवाय सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी, शर्मीन सेगल, फरीदा जलाल व फरदीन खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
शेखर सुमन या वेबसीरिजमध्ये मनीषा कोईरालाबरोबरच्या इंटिमेट सीनमुळेही चर्चेत होते. तर संजय लीला भन्साळी यांनी शेवटच्या क्षणी या सीनमध्ये बदल केले. शेखर सुमनच्या आधी टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर रुपाली म्हणाली होती की, “विकासाचा हा महायज्ञ पाहिल्यावर मलाही त्यात सहभागी व्हायला हवे असे वाटते. मला तुमच्या आशीर्वादाची व पाठिंब्याची गरज आहे जेणेकरून मी जे काही करत आहे ते मी योग्य व चांगले करु शकेन”.