मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : गरोदर अभिनेत्रीच्या पोटाला रेखा यांनी भर कार्यक्रमात केलं किस, उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 26, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rekha kissed on richa chaddha baby bump

Video : गरोदर अभिनेत्रीच्या पोटाला रेखा यांनी भर कार्यक्रमात केलं किस, उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी’ ही नवी कोरी वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 1 मे रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून नुकताच सिरिजचा प्रीमियर सोहळा पार पडला. या प्रीमियरसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये आलिया भट्ट, अनन्या पांडे, रेखा, सलमान खान अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी ऋचा चढ्ढा व रेखाचा एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  (rekha kissed on richa chaddha baby bump)

‘हिरामंडी’च्या निमित्ताने सर्व कलाकार एकत्रित जमा झाले होते. तेव्हा त्यावेळी उपस्थित असणाऱ्या रेखा या ऋचाबरोबर गप्पा मारत होत्या. ऋचा व अली फजल यांनी या वर्षी आई-वडील होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या वेळी ऋचा गरोदर असल्याचेही पाहायला मिळाले. तिचे पोट दिसत असून ती खूप सुंदर दिसत होती. यावेळी रेखा व ऋचा यांच्यामध्ये गप्पा सुरु होत्या आणि तेव्हाच रेखा यांनी ऋचाच्या पोटाला किस केल्याचे दिसून आले.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम सोढीची भूमिका साकारणारा सुप्रसिद्ध अभिनेता दिल्ली विमानतळावरुन बेपत्ता, वडील म्हणाले, “घरी परतलाच नाही आणि…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये एका नेटकाऱ्याने लिहिले की, “रेखा या चांगल्या मनाच्या आहेत”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “रेखाची ओव्हरअक्टिंग कधीही संपणार नाही”. दरम्यान या व्हिडीओला खूप पसंती मिळाली आहे.

आणखी वाचा – ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराजची मराठी मालिकेमध्ये एन्ट्री, सात वर्षांचा लीप आल्यानंतर कथेमध्ये ट्विस्ट

‘हिरामंडी’ या सिरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख, आदिती राव हैदरी, ऋचा चढ्ढा, शर्मिन सहगल, शेखर सुमन व फरदीन खान हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये काम करताना दिसणार आहेत. नुकताच ऋचा या सिरीजमधील तिच्या भूमिकेबद्दल सांगितले होते. ती म्हणाली की, “या सिरिजमधील माझी भूमिका ही देवदासासारखी आहे. ती ज्या मुलाबरोबर असते ती काही ना काही गोंधळ घालते. पण भूतकाळात ती खोटं बोलली होती. तसेच माझी भूमिका ही दु:खद असले तरीही ही भूमिका तितकीच चांगली आहे”. सध्या ऋचा गरोदर असून येत्या काही महिन्यातच ती बाळाला जन्म देऊ शकते.

Tags: baby bumpkissrekharicha chaddha
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
27 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

वृषभ, मिथुन व कुंभ राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ, तर काही राशींसाठी आरोग्याचा धोका, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.