Kartiki Gaikwad Tattoo : झी मराठी वहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाची लोकप्रियता ही सर्वश्रुत आहे. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. या शोमुळे कार्तिकीला खूप लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील तिचं ‘घागर घेऊन’ हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. या कार्यक्रमाची विजेती गायिका कार्तिकी ही तिच्या आवाजाने कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. अशातच तिने शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Singer Kartiki Gaikwad Tattoo)
कार्तिकीने तिच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये तिने तिच्या हातावर वडिलांच्या नावाचा काढलेला टॅटू दाखवला आहे. कार्तिकीने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या हातावर daddy लिहिलेला टॅटू काढला असून याची खास झलक तिने या व्हिडीओमधून शेअर केली आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकीने हा खास टॅटू काढला असून या टॅटूमुळे तिच्या वडिलांनाही आनंद झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा टॅटू काढल्यानंतर तिने वडिलांबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – प्रतिक्षा संपली! ‘पाऊस’ वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित, प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद, तुम्ही पाहिलात का?
कार्तिकीने या व्हिडीओखाली तिच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! माझं सर्वस्व असलेल्या माझ्या बाबांना आभाळाएवढं उदंड आयुष्य, आरोग्य व आनंद लाभो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना… तुमचा वाढदिवस खास आहे कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्ही खरा मान आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा”.
यापुढे तिने वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “अगदी खरा व सज्जन माणूस. काळजीने परिपूर्ण, मूल्य, प्रेम व अनुभवी असलेला एक माणूस, ज्याचा मी सर्वात जास्त आदर करते. त्यामुळे मी भाग्यवान आहे की, मला असे वडील मिळाले. या खास दिवशी मी तुमची मुलगी असण्याबद्दल किती महान आहे हे तुम्हाला सांगण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आणि बाबा तुम्ही माझे देव आहात आणि मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करते”.