Paus Series : ‘पाऊस’ हा कायमच प्रत्येकासाठी स्पेशल असतो. पावसाबरोबरच्या अनेकांच्या आठवणी या अविस्मरणीय असतात आणि या आठवणी बेभान करणार्या असतात. पाऊस आणि प्रेम याबद्दल आता व्यक्त होण्याचे कारण म्हणजे ‘इट्स मज्जा’ची आगामी सीरिज ‘पाऊस’. ‘मीडिया वन सोल्युशन्स’ व ‘इट्स मज्जा’ हे कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आहे आणि त्यामुळेच ‘इट्स मज्जा’ कायमच मनोरंजक कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. अशातच ‘इट्स मज्जा’ ‘पाऊस’ या नवीन सीरिजमधून एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येत आहे. (Paus Series first Episode)
पाऊस आणि प्रेमाचं नात हे प्रत्येकाला भावणारं आहे. प्रत्येकाच्या प्रेमकहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी पाऊस हा महत्वाचा असतो. याच पाऊसाचं आणि प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणारी ‘पाऊस’ ही नवीन वेबसीरिज आपल्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि या ट्रेलरमधून पाऊस, प्रेम व प्रेम करणारी दोन माणसं पाहायला मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांना या सीरिजविषयी व या सीरिजच्या कथानकाविषयी उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आता या सीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘पाऊस’ या सीरिजमध्ये मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा अभिनेत्री आरती बिराजदार ही मुख्य भूमिकेत असून तिच्याबरोबर अक्षय खैरे हादेखील मुख्य भूमिकेत आहे. ‘सुंदरी’ मालिकेत आरती ही कलेक्टरच्या भूमिकेत होती. त्यामुळे एक सुशिक्षित, जबाबदार, आपल्या कुटुंबासाठी जगणारी आणि सर्वांना सांभाळून घेणारी अशी तिची भूमिका होती. या मालिकेनंतर आरती आता एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पाऊस’ ही सीरिज आरती व अक्षय या मुख्य दोन भूमिकांबद्दल असली तरी या सीरिजमध्ये इतर अनेक लोकप्रिय कलाकार आहेत.
दरम्यान, ‘पाऊस’ची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांनी केलं आहे. तसंच या सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी स्वीकारली आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत. प्रेम, पाऊस आणि या दोघांमधला गोडवा व दुरावा या सीरिजमधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि हा अनुभव म्हणजेच ‘पाऊस’ ही सीरिज आज १९ ऑगस्टपासून दर सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’ या युट्यूब वाहिनीवर पाहता येणार आहे.