Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. कोणाचे काय चुकले? आणि कोणी काय करायला हवे? या सर्व गोष्टी रितेशने सांगितल्या. कालच्या भाऊचा धक्कामध्ये प्रेक्षकांना व स्पर्धकांना चांगलेच धक्के मिळाले यातील पहिला धक्का म्हणजे निखिल दामलेचं एलिमिनेशन. दर आठवड्याच्या रविवारी एलिमेशन पार पडते आणि या पर्वाचे दुसरे एलिमिनेशन काल पार पडले. या एलिमिनेशनमध्ये निखिल दामले हा स्पर्धक घराबाहेर पडला आहे. नवीन पर्वातील तीन आठवड्यानंतर निखिल घराबाहेर पडला आहे. (Bigg Boss Marathi 5 Nikhil Damle)
घराबाहेर पडल्यानंतर नुकताच निखिलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने इट्स मज्जालं दिलेल्या मुलाखतीत घरातील दोन आठवड्यांत त्याला आलेले अनुभव शेअर केले. यावेळी निखिलला घरातील प्रवासाबाबत संवाद साधला. या संवादादरम्यान, त्याला पुन्हा एकदा वाईल्ड कार्ड एन्ट्री असेल तर तुला या घरामध्ये पुन्हा जायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल निखिल असं म्हणाला की, “ते आता सगळं गुलदस्त्यात आहे. आता त्याबाबत मी काही सांगून प्रेक्षकांना चर्चेची वाट मोकळी करुन देणार नाही. पण जर वाईल्ड कार्ड एन्ट्री आणि तसंच काही घडणार असेल तर बघूयात पुन्हा काय होतं.” त्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये व प्रेक्षकांमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आणखी वाचा – प्रतिक्षा संपली! ‘पाऊस’ वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित, प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद, तुम्ही पाहिलात का?
गेल्या आठवड्यात योगिता, निखिल, सूरज व अभिजीत सावंत हे चार सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. अरबाज व अभिजीत यांना मिळालेल्या स्पेशल पॉवरमध्ये अरबाजने निक्कीला आणि अभिजीतने पॅडी कांबळे यांना नॉमिनेशनपासून वाचवले होते. मात्र वैभव त्याला मिळालेल्या पॉवरमध्ये घन:श्यामला नॉमिनेशनपासून वाचवतो आणि त्याच्याऐवजी अभिजीतला नॉमिनेट करतो. त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, योगिता, निखिल व अभिजीत हे चार स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत होते. यापैकी निखिलचा या घरातील प्रवास संपला आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरातील निखिलचा गेम काही दिवस खराब असल्याने तो लवकरच घराबाहेर पडणार असल्याच्या चर्चा वर्तवल्या जात होत्या आणि या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत. निखिलचा बिग बॉसच्या घरातील प्रवास तीन आठवड्यांमध्ये संपला आहे. त्यामुळे आता अभिनेता पुन्हा कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार?यांची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.