Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या रविवारच्या ‘भाऊचा धक्का’मध्ये प्रेक्षकांबरोबरचं स्पर्धकांनादेखील धक्का मिळाला हा धक्का म्हणजे एकाच वेळी दोन स्पर्धकांचे झालेले एलिमिनेशन. दर आठवड्याच्या रविवारी एलिमेशन पार पडते आणि या पर्वाचे दुसरे एलिमिनेशन काल पार पडले असून या एलिमिनेशनमध्ये निखिल दामलेसह योगिता चव्हाणदेखील घराबाहेर पडली. नॉमिनेशन टास्कमध्ये ‘बिग बॉस’ने एक नवीन ट्विस्ट आणत या घरातून आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा दूसरा स्पर्धक कोण? याविषयी सर्वांना धाकधुक लागून राहिली होती. अशातच ‘बिग बॉस’ने या घरातील दुसऱ्या एलिमिनेशनची घोषणा केली. या दुसऱ्या एलिमिनेशनमध्ये घरातून योगिता चव्हाण ही स्पर्धक घराबाहेर पडली आहे. (Bigg Boss Marathi 5 Yogita Chavan)
घराबाहेर पडल्यानंतर नुकताच योगिताने माध्यमांशी संवाद साधला. तिने घरातील दोन आठवड्यांमध्ये तिला आलेले अनुभव शेअर केले. यावेळी योगिताला घरातील तिच्या प्रवासाबाबत विचारण्यात आलं. याबद्दल ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत तिने असं म्हटलं की, “प्रवास खूप चांगला होता. पहिले दोन ते तीन दिवस मला रमायला वेळ लागला. पहिल्या नॉमिनेशन टास्कनंतर खूप चांगले मित्र-मैत्रिणी मला तिथे भटले. टास्कमध्ये मी दिसायचे. टास्क खेळायचा ते मला माहित होतं. तिथे मी छान दिसायचे. पण राजकारण करावं लागतं तिथे मी कमी पडले. टीव्हीवर फक्त एक तास ‘बिग बॉस’ असतो. मात्र तिथे आम्ही चोवीस तास असतो”.
यापुढे ती असं म्हणाली की, “या घरात खूप काही गोष्टी घडत असतात. बाहेरुन बघून जेवढं मला सोपं वाटलेलं तेवढं ते अजिबात नव्हतं. घरामध्ये जी भांडणं होतात, कुटुंबापासून लांब राहतात, घरातील स्पर्धक याचा सामना करत लढत आहेत. मी फक्त एकटी रडली नाही तिकडे सगळे रडले आहेत. पण काही लोक दिसले काही दिसले नाहीत. बऱ्याच गोष्टी बाहेर दिसत नाहीत. आतमध्ये खूप आरडाओरडा, भांडणं असतात. तासाभरात जितकं दाखवता येईल तितकं दाखवलं जातं. मला तसा वैयक्तिक कोणी फार त्रास दिला नाही. माझा स्वभावच असा आहे की, इतरांना भांडताना बघून मला खूप वाईट वाटायचं. त्याचाच जरा मला त्रास झाला”.
दरम्यान, घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, योगिता, निखिल व अभिजीत हे चार स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत होते. यापैकी सूरज व अभिजीत हे दोघे सुरक्षित झाले. पण निखिल व योगिता हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत होते. तसंच गेले काही दिवस योगिता या घरात तिला राहायचे नसल्याचे म्हणत होती. “मला ही ट्रॉफी नको, मला घरी जायची इच्छा आहे” असं म्हणत तिने मला या घरातून बाहेर जायचे असल्याची विनंती ‘बिग बॉस’ला केली होती आणि अखेर तिचा या घरातील प्रवास संपला आहे.