शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गरोदरपणानंतर किती बदलली आहे कार्तिकी गायकवाड?, हातावर गोंदवला वडिलांच्या नावाचा टॅटू, म्हणाली, “माझं सर्वस्व…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 19, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saregamapa fame Singer Kartiki Gaikwad special tattoo on the occasion of her father birthday and shared the video on social media

गायिका कार्तिकी गायकवाडने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त काढला खास टॅटू, व्हिडीओ शेअरत करत व्यक्त केल्या भावना

Kartiki Gaikwad Tattoo : झी मराठी वहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाची लोकप्रियता ही सर्वश्रुत आहे. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली गायिका म्हणजे  कार्तिकी गायकवाड. या शोमुळे कार्तिकीला खूप लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील तिचं ‘घागर घेऊन’ हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. या कार्यक्रमाची विजेती गायिका कार्तिकी ही तिच्या आवाजाने कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. अशातच तिने शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Singer Kartiki Gaikwad Tattoo)

कार्तिकीने तिच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये तिने तिच्या हातावर वडिलांच्या नावाचा काढलेला टॅटू दाखवला आहे. कार्तिकीने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या हातावर daddy लिहिलेला टॅटू काढला असून याची खास झलक तिने या व्हिडीओमधून शेअर केली आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकीने हा खास टॅटू काढला असून या टॅटूमुळे तिच्या वडिलांनाही आनंद झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा टॅटू काढल्यानंतर तिने वडिलांबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad – Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9)

आणखी वाचा – प्रतिक्षा संपली! ‘पाऊस’ वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित, प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद, तुम्ही पाहिलात का?   

कार्तिकीने या व्हिडीओखाली तिच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! माझं सर्वस्व असलेल्या माझ्या बाबांना आभाळाएवढं उदंड आयुष्य, आरोग्य व आनंद लाभो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना… तुमचा वाढदिवस खास आहे कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्ही खरा मान आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा”.

आणखी वाचा – “रडतात सगळेच दिसले फक्त मीच”, Bigg Boss Marathi मधून बाहेर आल्यानंतर योगिता चव्हाणचे खुलासे, म्हणाली, “आतमध्ये खूप काही घडत असतं पण…”

यापुढे तिने वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “अगदी खरा व सज्जन माणूस. काळजीने परिपूर्ण, मूल्य, प्रेम व अनुभवी असलेला एक माणूस, ज्याचा मी सर्वात जास्त आदर करते. त्यामुळे मी भाग्यवान आहे की, मला असे वडील मिळाले. या खास दिवशी मी तुमची मुलगी असण्याबद्दल किती महान आहे हे तुम्हाला सांगण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आणि बाबा तुम्ही माझे देव आहात आणि मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करते”.

Tags: kartiki gaikwadKartiki Gaikwad Tattoomarathi singer
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Nikhil Damle first reaction and he talked about the wild card entry.

Bigg Boss Marathi च्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करणार निखिल दामले?, म्हणाला, "सध्यातरी गुलदस्त्यात पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.