शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुकानावर स्वत:चा फोटो पाहून भारावला ‘हा’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “अनेक हिरोंचे फोटो…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 28, 2024 | 3:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Santosh Juvekar shocked to see his photo on the shop and he expressed his happiness by shared the post

दुकानावर स्वत:चा फोटो पाहून भारावला संतोष जुवेकर, सोशल मीडियावर फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

कलाकार मंडळी ही सोशल मीडियाद्वारे नेहमीच व्यक्त होत असतात. कलाकार हे आपले अनुभव, आपले किस्से, त्याचबरोबर काही खास आठवणी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात आणि या आठवणी व किस्से चाहत्यांना जाणून घेण्यातही चांगलाच रस असतो. अशाच एका अभिनेत्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास फोटो शेअर करत त्याच्या लहानपणीची एक आठवण शेअर केली आहे आणि हा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर.

मराठी मालिका व चित्रपटांत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा संतोष आता हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप उमटवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांतूण् आलेल्या या अभिनेत्याविषयेई त्याच्या चाहत्यांना खूपच कुतूहल आहे. अशातच अभिनेत्याने त्याच्या लहानपणाबद्दल एक आठवण शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. एका केसकर्तनलयाला संतोषचा फोटो लावल्यामुळे तो भारावून गेला आहे आणि त्याला झालेला आनंद त्याने या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

आणखी वाचा – कृष्णा मुखर्जीने केलेल्या ‘त्या’ आरोपांवर निर्मात्यांची प्रतिक्रिया आली समोर, सोशल मीडियाद्वारे मांडली बाजू, म्हणाले, “ते सगळे आरोप…”

संतोषने या दुकानाचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “लहानपणी बाबा सलूनमध्ये केस कापायला घेऊन जायचे. तेव्हा केस कपणारे उत्तम काका मला त्यांच्या दुकानातल्या भिंतीवर लावलेल्या अनेक हिरोंचे फोटो दाखवून विचारायचे “बाळा कुणासारखे कापू केस तुझे?, अमिताभ बच्चनसारखे की मिथुन, अनिल कपूर, शाहरुख खान की सलमान खानसारखे आणि मग त्यातला मी एक फोटो निवडायचो आणि सांगायचो. पण ते बाबा सांगतील तसेच केस कापायचे.”

आणखी वाचा – “काका डान्स करताना ओव्हर करतात”, नवऱ्याला डिवचणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं, म्हणाल्या, “त्यांचा डान्स करणं…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “असो ते महत्वाचं नाही तर सांगायचं कारण हे की मी शूटला जाताना अचानक मला रस्त्यात एक केस कर्तनालय (सलून) दिसलं आणि त्याच्या नावाच्या बोर्डवर चक्क माझा फोटो लावला होता. त्यामुळे आता बहुतेक मुलं दुकानात जाताना बाहेरच ठरवत असतील की, कुणासारखे केस कापायचे.” यापुढे संतोषने “ये बाप्पू. साला अपून तो हिरो बनगया” असं लिहीत त्याचा हा आनंद व्यक्त केला आहे.

Tags: marathi actormarathi entertainment newssantosh juvekar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Marathi actress Gayatri Datar expressed her anger by sharing post on social media against a person who asked her for sex

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी, अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला संताप, म्हणाली, "अशा मानसिकतेला...."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.