बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोठवणारी थंडी, पाणी टंचाई, वीज पुरवठा आणि…; ध्यान व मनःशांतीसाठी हिमाचल प्रदेशला गेली होती सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “आयुष्यात…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 16, 2024 | 4:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sanskruti Balgude shared post about why she is away from social media for some time.

गोठवणारी थंडी, पाणी टंचाई, वीज पुरवठा आणि...; ध्यान व मनःशांतीसाठी हिमाचल प्रदेशला गेली होती सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, "आयुष्यात..."

मनोरंजन विश्वात काम करताना या क्षेतरांगे जितकं ग्लॅमर आहे, टीकांच या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास हा खडतर आहे. या इंडस्ट्रीत काम करणारी अनेक कलाकार मंडळी धावळपीच्या जगातून मन:शांती मिळवण्यासाठी अनेक पर्यायांचा अवलंब करतात. प्रवास, वाचन, योगा, ध्यानधारणा अशा अनेक मार्गांनी कलाकार मंडळी आपली मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच मन:शांतीसाठी सोशल मीडिया व सिनेसृष्टीपासून लांब गेलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.

आपला स्टायलिश अंदाज, अभिनय व हटके नृत्यकौशल्य यामुळे चर्चेत राहणारी संस्कृती गेली काही दिवस तिच्या सोशल मीडियापासून लांब होती. त्यामुळे अनेकांना ही अभनेत्री नेमकी गेली कुठे याबद्दल प्रश्न पडला होता. मात्र आता  स्वत: अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मी अजूनही काँक्रिटच्या जगात परत जात आहे, पण त्याचबरोबर मी नक्की कुठून सुरुवात करावी हेदेखील शोधत आहे. मी एक अशी व्यक्ती आहे, जिने आयुष्यात कधीही ध्यान केले नाही आणि एक दिवस ती ‘विपश्यना’ करावी असा विचार करते. एखादे बंधन मला कधीही अस्वस्थ करणारे नव्हते. पण ध्यानधारणा ही मला अस्वस्थ करणारी होती.”

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????????????????? (@sanskruti_balgude_official)

आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्याच्या पहिल्या वाढदिवसाचं ऑस्ट्रेलियामध्ये जंगी सेलिब्रेशन करतेय पूजा सावंत, हातातील हिरव्या चुड्याने वेधलं लक्ष, म्हणाली, “ज्याने माझं आयुष्य…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “विपश्यना करताना दिवसातून आठ तास तुम्हाला तुमच्या अस्थिर मनाला स्थिर करावे लागते. आणि हे खूपच अवघड होते, पण हळूहळू ते बदललते. ध्यानधारणा हे जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन निर्माण करतं. असे म्हटले जाते की, ‘विपश्यना’ हा एक सराव व प्रयत्न आहे. विपश्यना तुम्हाला आधार देते, तुम्हाला कोण आणि काय महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देते, तुम्हाला शहाणे बनवते, या जगात जे काही आहे ते सोपे करते.”

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने खरेदी केली लाखो रुपयांची कार, आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “अट्टाहास केला…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “याठिकाणची गोठवणारी थंडी, पाणी टंचाई, वीज पुरवठ्याचा अभाव अशी परिस्थिती होती. मात्र मला पर्वत, शांतता, शुद्ध हवा या गोष्टींपुढे या अडचणी मागे पडल्या. कृपया तुमच्या आयुष्यात एकदा तरी ‘विपश्यना’ करा आणि जरी तुम्ही नाही केले तरी तुम्ही फक्त तुमचा हेतू शुद्ध ठेवा, अंतःकरण दयाळू ठेवा आणि कायम चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवा.” दरम्यान, अभिनेत्रीने १५ एप्रिल रोजी ही पोस्ट शेअर करत ती लडाखमध्ये असल्याची माहिती देत याचे कारणही तिने सांगितले आहे. याआधी तिने १० मार्च २०२४ रोजी शेवटची पोस्ट शेअर केली होती. 
Tags: marathi actressmarathi entertainment newssanskruti balgude
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Chief Minister Eknath Shinde met Salman Khan After the firing photos viral on social media

राहत्या घरावर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानच्या भेटीला, नेमकं काय बोलणं झालं?, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.