छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. गेले काही वर्षे हा कार्यक्रम महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांचेदेखील भरभरून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, प्रभकार मोरे, श्याम राजपूत यांसह गौरव मोरे, शिवाली परब, वनिता खरात, प्रियदर्शिनी, ईशा, पृथ्विक प्रताप यांसारख्या नवोदित कलाकारांनादेखील चांगलीच लोकप्रियता मिळाली. याच फळीत नव्याने सहभागी झालेले कलकार म्हणजे प्रथमेश शिवलकर व श्रमेश बेटकर ही जोडी.
‘कानामागून आली अन् तिखट झाली’ या म्हणीप्रमाणे या जोडगोळीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अभिनयासह हे दोघे त्यांच्या सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. अशातच आपल्या विनोदी अभिनय व लेखनाने चर्चेत राहणारा प्रथमेशणे त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. प्रथमेश शिवलकरने आई,बाबांबरोबरचा खास फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या घरी एका नव्या कुटुंब सदस्याचं आगमन झाल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा – कर्ज फेडण्यासाठी प्राजक्ता माळी करत आहे वेगवेगळं काम, स्वतःच शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, “कर्जासाठी सगळं…”
प्रथमेशने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली असून सोशल मीडियावर खास पोस्टद्वारे त्याने आपल्या चाहत्यांबरोबर ही खुशखबर शेअर केली आहे. त्याचबरोबर या पोस्टखाली त्याने त्याच्या या नवीन स्वप्नपूर्तीनिमित्त आनंदी भावनाही व्यक्त केल्या आहेत. आपल्या नवीन गाडीबरोबरचे खास फोटो शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “स्वप्नातील गाडी खरेदी केली याचा आनंद आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचा आहे आई-बाबांच्या डोळ्यातला आनंद, समाधान आणि कौतुक”.
त्याचबरोबर प्रथमेशने “याचसाठी केला होता अट्टाहास भाग १” असं म्हणत या पोस्टमध्ये हा भाग १ आहे आणि भाग २ लवकरच येणार आहे हेदेखील अधोरेखित केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या भाग २ ची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, या प्रथमेशच्या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या पोस्टखाली प्रथमेशच्या अनेक चाहत्यांसह हास्यजत्रेच्या सर्व कलाकारांनी अभिनंदन म्हणत त्याचे कौतुक केले आहे.