सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर नवऱ्याच्या पहिल्या वाढदिवसाचं ऑस्ट्रेलियामध्ये जंगी सेलिब्रेशन करतेय पूजा सावंत, हातातील हिरव्या चुड्याने वेधलं लक्ष, म्हणाली, “ज्याने माझं आयुष्य…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 16, 2024 | 2:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja Sawant wished her husband Siddesh Chavan on his birthday through a special video

लग्नानंतर नवऱ्याच्या पहिल्या वाढदिवसाचं ऑस्ट्रेलियामध्ये जंगी सेलिब्रेशन करतेय पूजा सावंत, हातातील हिरव्या चुड्याने वेधलं लक्ष, म्हणाली, "ज्याने माझं आयुष्य..."

आपल्या मनमोहक हास्याने व मनमोहक सौंदर्याने मराठीसह हिंदी प्रेक्षकांवर मोहिनी घालणारी मराठमोळी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. दोन महिन्यांपूर्वी २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर पूजा तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियाला गेली असून ती तिथे नवऱ्यासह लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. पूजाचा नवरा हा मूळचा भारतातला असला तरी तो ऑस्ट्रेलियात कामानिमित्त राहतो पूजाने तिच्या नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला एन्जॉय करतानाचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. अशातच आज पूजाच्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त पूजाने खास व्हिडीओ शेअर करत नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

आणखी वाचा – कर्ज फेडण्यासाठी प्राजक्ता माळी करत आहे वेगवेगळं काम, स्वतःच शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, “कर्जासाठी सगळं…”

पूजाने नवऱ्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असं म्हटलं आहे की, “ज्याने माझे आयुष्य खऱ्या अर्थाने उजळले आणि माझे हृदय हे नितांत प्रेमाने भरले त्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. यापुढेही आपल्याला अशी अनेक वर्ष एकत्र राहायचं आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा सिद्धेश.” पूजाने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर पूजाच्या नवऱ्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.

आणखी वाचा – मनोज वाजपेयीचा ‘सायलेन्स’ ते राजपाल यादवचा ‘काम चालू है’, येत्या आठवड्यात ड्रामा, थ्रिलर व सस्पेन्सने भरलेले चित्रपट पाहता येणार, जाणून घ्या…

दरम्यान,  पूजाचा होणार नवरा सिद्धेश चव्हाण सध्या भारतात राहत नसून ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत काम करतो. मात्र तो मूळचा मुंबईचा आहे. कामानिमित्त तो काही काळ ऑस्ट्रेलियात राहत आहे आणि पूजादेखील लग्नानंतरचा खास वेळ नवऱ्याबरोबर एकत्र घालवत आहे.     



Tags: marathi entertainment newspooja sawantSiddhesh Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
palak sindhvani baught new car

Video : 'तारक मेहता…'मधील भिडेच्या लेकीने विशीमध्येच खरेदी केली दुसरी महागडी कार, आई-वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.