शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वाईट झालं, रडत बसून…”, १५ वर्षांनंतर बायकोपासून विभक्त होताच संजीव सेठ यांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले, “जे काही झालं ते…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 9, 2025 | 11:58 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sanjeev seth lataa saberwal divorce

“वाईट झालं, रडत बसून...”, १५ वर्षांनंतर बायकोपासून विभक्त होताच संजीव सेठ यांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले, “जे काही झालं ते...”

कलाक्षेत्रातील मंडळींचे नातं, रिलेशनशिप स्टेटस, लग्न, घटस्फोट याबाबत बऱ्याच चर्चा रंगताना दिसतात. चाहत्यांना त्यांच्या या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यात अधिक रस असतो. एखाद्या सुप्रसिद्ध जोडप्याचा घटस्फोट झाला तर अनेक चर्चांना तोडं फुटतं. असंच काहीसं छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध कपल संजीव सेठ व लता सभरवाल यांच्याबाबत घडलं. लग्नाच्या तब्बल १५ वर्षांनी संजीव व लता यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच घटस्फोटाबाबत लता यांनी एक पोस्ट शेअर केली होती. याद्वारे संजीव आणि मी आता एकत्र राहत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण या दोघांमध्ये नक्की काय बिनसलं? याबाबत जोडप्याने बोलणं टाळलं आहे. संजीव यांनी लता यांच्यापासून दूर झाल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य केलं. (sanjeev seth lataa saberwal divorce)

२०१०मध्ये संजीव व लता यांनी थाटामाटात लग्न केलं. छोट्या पडद्यावर या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहायचे. तसेच त्यांची रिअल लाइफ केमिस्ट्रीही कमालीची होती. मात्र संजीव व लताने घेतलेला निर्णय समजल्यानंतर अनेकांना मोठा धक्काच बसला. संजीव व लताला एक मुलगा आहे. तसेच संजीवचं हे दुसरं लग्न होतं.

आणखी वाचा – “प्रार्थना सभेत येऊनही कलाकार…”, आशीष विद्यार्थींनी सांगितलं बॉलिवूडकरांचं काळं सत्य, तिथेच गॉसिप करतात तेव्हा…

लता यांच्यापासून दूर राहण्याबाबत बॉम्बे टाइम्सशी संजीव यांनी संवाद साधला. ते म्हणाले, “आमच्या लग्नाला १६ वर्ष झाली. आता जे काही झालं ते खूपच दुःखद आहे. पण त्याच्याबाबत मी रडत बसू शकत नाही. आयुष्य असंच आहे, ते कधीच थांबत नाही. आपल्यालाही पुढे चालतच राहावं लागणार”. संजीव यांच्या बोलण्यामध्ये दुःख जाणवलं. पुढे ते म्हणाले, “सध्यातरी मी माझ्या कामाकडेच लक्ष देत आहे. मला माझ्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. शिवाय मला माझ्या पुढील आयुष्याकडे लक्ष द्यायचं आहे”.

आणखी वाचा – “माझ्यामुळेच आईचा मृत्यू झाला”, बॉबी डार्लिंगचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “तिचे दागिने चोरुन…”

लता यांनी त्यांच्या पोस्टद्वारे म्हटलेलं की, “खूप काळ शांत बसल्यानंतर मी हे घोषित करते की, मी (लता सभरवाल) पती (संजीव सेठ) पासून वेगळी झाली आहे. मला एक गोड दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते”. पुढे त्या म्हणाल्या, “त्याच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देते. माझ्या कुटुंबाचा सन्मान करण्याची मी सगळ्यांना विनंती करते. आमच्या शांतीपूर्ण आयुष्याचा सन्मान करा. यापुढे याबाबत मला काहीच विचारु नका किंवा फोनवरुनही कोणतचे प्रश्न विचारु नका”. आता लता व संजीव त्यांचं आयुष्य जगत आहेत.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
shreya ghoshal viral video

Video : गरोदर चाहतीच्या बेबी बंपला हात लावत श्रेया घोषालने गायलं गाणं, बाळाची हालचाल सुरु झाली अन्...; सुंदर व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.