सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 20, 2026 | 3:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prapti Redkar

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०' शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

Prapti Redkar : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील ‘सावली’ हे पात्र प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे. आपल्या मधुर आवाजामुळे आणि संघर्षमय प्रवासामुळे सावलीची ओळख अधिक ठळक झाली आहे. संगीत हे या पात्राच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असून, त्याच संगीतामुळे तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळताना प्रेक्षक पाहत आहेत. जागतिक संगीत दिनानिमित्त सावलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने संगीताशी असलेल्या आपल्या वैयक्तिक नात्याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.

प्राप्ती म्हणाली , “माझे बाबा प्रवीण रेडकर गायक आहे ते लाईव्ह शोज करतात, त्यामुळे संगीत आणि गायनाची आवड पहिल्या पासून होती. मी बाबा आणि काका सोबत गावी असताना भजनाला जायचे तेव्हा गायचे आणि आज ही गाते पण अभिनय क्षेत्रात असल्यामुळे मी गायनाकडे इतके लक्ष दिलं नाही. पण सावली ही भूमिका साकारताना मी संगीताच्या अजून जवळ गेले आहे. कारण सावलीला जो आवाज दिला आहे तो दिला आहे केतकी माटेगावकरने आणि ती माझी वन ऑफ द आवडती गायिका आहे”.

आणखी वाचा – दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

“सावलीमुळे मला खूप गोष्टींचं ज्ञान मिळत आहे. मालिकेत एक गाणं आहे ‘माझे माहेर पंढरी २.०’. हे गाणं मालिकेत तेव्हा दाखवले आहे जेव्हा सावलीचं सत्य सर्वांसमोर येतं. सारंग आणि मेहेंदळे कुटुंबाला कळतं की जो आवाज ते इतके काळ ऐकत होते तो आवाज ताराचा नसून सावलीचा आहे. तर जेव्हा आम्ही हे गाणं शूट करत होतो तेव्हा मी खरी रडत होते. प्राप्ती म्हणून मला खूप वाईट वाटत होतं की तिने इतकं सहन केलं आहे आणि आता तिला इतका प्रेम करणारा नवरा भेटला आहे. त्यांनी तिला जी ती डिझर्व करते ती प्रसिद्धी, ओळख आणि कौतुक मिळवण्यात मदत केली आहे. या सर्व भावना अनुभवताना मला प्राप्ती म्हणून खूप रडायला येत होतं जेव्हा जेव्हा ते गाणं वाजत होतं. हे गाणं माझ्या खूप जवळचं आहे”.

आणखी वाचा – अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

प्राप्ती पुढे म्हणाली , “तुम्हा सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा. संगीत म्हणजे थेरपी आहे, ते माणसाच्या आयुष्यात खूप बदल घडवू शकतं. मी जेव्हा खूप आनंदात असते तेव्हा संगीत ऐकते, जेव्हा मी थोडी उदास असते किंवा राग येतो तेव्हाही गाणी ऐकते. प्रत्येक मूडमध्ये मी गाणी ऐकते आणि त्यांच्याशी रिलेट करते. सावलीला असंच प्रेम देत रहा. मालिकेला २ वर्षं झाली आहेत , पण प्रेक्षकांचं प्रेम आजही तितकंच आहे जितकं पहिल्या भागावेळी होतं.”

Tags: marathi actressPrapti Redkarsavlyachi janu savali
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Anushka Sarkate Mehendi Ceremony
Entertainment

मेहंदी है रचनेवाली! अनुष्का सरकटेच्या हातावर रंगली निखिलच्या नावाची मेहंदी, खास लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

जून 22, 2026 | 9:27 am
Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
Next Post
Anushka Sarkate Mehendi Ceremony

मेहंदी है रचनेवाली! अनुष्का सरकटेच्या हातावर रंगली निखिलच्या नावाची मेहंदी, खास लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.