शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : गरोदर चाहतीच्या बेबी बंपला हात लावत श्रेया घोषालने गायलं गाणं, बाळाची हालचाल सुरु झाली अन्…; सुंदर व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 9, 2025 | 11:58 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shreya ghoshal viral video

Video : गरोदर चाहतीच्या बेबी बंपला हात लावत श्रेया घोषालने गायलं गाणं, बाळाची हालचाल सुरु झाली अन्...; सुंदर व्हिडीओ समोर

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकांपैकी गायिका श्रेया घोषालचं नाव आदराने घेतलं जातं. तिच्या आवाजाचे फक्त देशातच नव्हे तर जगभरात लाखो चाहते आहेत. श्रेयाच्या आवाजाची जादू खरं तर काही औरच आहे. तिच्या प्रत्येक गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असताना. प्रत्यक्षात श्रेयाला गाताना ऐकणं ही एक वेगळीच गंमत आहे. एखादं गाणं तिने गाण्यास सुरुवात केली तर डोळे बंद करुन फक्त ऐकत राहावं असा अनुभव असतो. कलेच्या जोरावर आणि सुंदर आवाजामधून तिने प्रेक्षकांना कमालीची भूरळ पाडली आहे. कामाबाबत तर ती परफेक्ट आहेच. पण त्याचबरोबरीने एक व्यक्ती म्हणूनही श्रेया प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करुन राहिली. याचंच एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. (shreya ghoshal viral video)

गायनाच्या रिएलिटी शोमध्ये परीक्षक पदाची धुरा सांभाळताना श्रेयाला आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. दरम्यान शोमध्ये भावनिक प्रसंगी तिच्या डोळ्यांमध्ये पाणीही आलं. क्षणात भावनिक, समोरच्या व्यक्तीवर प्रेम करणाऱ्या श्रेयाने सगळ्यांचंच मन जिंकलं आहे. गरोदर चाहती श्रेयाला भेटायला आली होती. यावेळी श्रेयाने वेळात वेळ काढून तिला भेट दिली. चाहतीचं तिच्यावर असणारं प्रेम समजून घेतलं. श्रेया इथवरच थांबली नाही तर तिच्या पोटात असणाऱ्या बाळाबाबतही प्रेम व्यक्त केलं.

आणखी वाचा – “वाईट झालं, रडत बसून…”, १५ वर्षांनंतर बायकोपासून विभक्त होताच संजीव सेठ यांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले, “जे काही झालं ते…”

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

श्रेयाने चाहतीच्या पोटाला हात लावला. तिला खूपच आनंद झाला. गुडघ्यावर श्रेया बसली आणि महिलेच्या पोटाला हात लावून ती गाणं गात राहिली. यावेळी आईच्या पोटात असणाऱ्या बाळाचीही हालचाल व्हायला लागली. श्रेयालाही ते जाणवलं. ती अगदी खूश झाली. पुढे गाणं बोलत असताना बाळ हालचाल करत राहिलं. श्रेयाचा हा आनंद काही औरच होता.

आणखी वाचा – “प्रार्थना सभेत येऊनही कलाकार…”, आशीष विद्यार्थींनी सांगितलं बॉलिवूडकरांचं काळं सत्य, तिथेच गॉसिप करतात तेव्हा…

श्रेयाने दिलेली वागणूक पाहून चाहतीही खूश झाली. पुन्हा श्रेयाने पोटाला हात लावत ऑल इज वेल अस गंमतीने म्हटलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच श्रेयाच्या कृतीचं सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. श्रेया तू खरंच ग्रेट आहेस, लहान बाळ किती खूश झालं असेल, मला असं वाटतं बाळ पोटात आनंदाने डान्स करत असेल अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Tags: bollywood newsentertainment newsshreya ghoshal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Yere Yere Paisa 3 new song

‘येरे येरे पैसा ३’चं धमाकेदार गाणं प्रदर्शित, अमेय खोपकरांच्या लेकाचं चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल, पाहा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.