Raghavendra Rao Viral Video : अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि क्रिती शेट्टी या अभिनेत्रींचे हात खेचल्याबद्दल तेलगू सिनेमाचे ज्येष्ठ दिग्दर्शक के. राघवेंद्र राव यांना ट्रोल केले जात आहे. हैदराबादमध्ये दिग्दर्शक अनिल रविपुडी यांच्या नवीन चित्रपटाच्या लॉन्चवेळी ८४ वर्षीय राघवेंद्र राव ओपनिंग शॉटचे दिग्दर्शन करत होते. यादरम्यान तो अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि क्रिती शेट्टी यांचा हात धरून त्यांना स्वतःकडे ओढताना दिसला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत दिग्दर्शकाच्या वागण्यावर जोरदार टीका केली आहे. मुहूर्ताच्या चित्रीकरणाची पोझिशन ठरवण्याची ही घटना फिल्म लॉन्च इव्हेंटची आहे. या चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, नंदामुरी कल्याणराम, कीर्ती सुरेश आणि क्रिती शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पारंपरिक मुहूर्त समारंभाचा एक भाग म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक राघवेंद्र राव यांना सुरुवातीच्या शॉटचे दिग्दर्शन करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. या कार्यक्रमात निर्माते अल्लू अरविंद यांनी चित्रपटाची पहिली टाळी दिली, तर दिल राजू आणि सुरेश बाबू यांच्यासह अनेक मोठे निर्माते तिथे उपस्थित होते. शॉट सुरू होण्यापूर्वी राघवेंद्र राव कलाकारांना स्टेजवर बसवत होते. हात कसे काढायचे आणि पोज कशी द्यायची हे शिकवले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये, राघवेंद्र राव शॉटसाठी कलाकारांची स्थिती ठरवत असल्याचे दिसून येते. तो प्रथम कीर्ती सुरेशला तिचा हात धरून स्वतःकडे खेचतो, नंतर त्याचा विचार बदलतो आणि कृती शेट्टीला मार्गदर्शन करु लागतो. त्यानंतर तो मुख्य अभिनेते व्यंकटेश आणि कल्याणराम यांच्याकडे जातो. तो दृश्य योग्य दिसण्यासाठी अभिनेत्रींच्या कंबरेवर आणि खांद्यावर हात कसा ठेवावा याविषयी दोन्ही अभिनेत्यांना सूचना देताना दिसत आहे.
आणखी वाचा – वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…
सोशल मीडियावर युजर्सनी आपली नाराजी व्यक्त केली. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आल्यानंतर चित्रपट निर्मात्यावर टीका सुरू झाली. तो विनाकारण अभिनेत्रींना स्पर्श करत असल्याचा आरोप अनेक यूजर्सने केला आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, तो पोझिशनला हात न लावताही सांगू शकतो. महिलांना त्यांच्या संमतीशिवाय अशा प्रकारे ओढणे योग्य नाही.
आणखी वाचा – सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं
जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनेनंतर यावर्षी जानेवारी महिन्यात झालेला जुना वादही पुन्हा चर्चेत आला आहे. वापरकर्त्यांनी त्याच्या एका जुन्या व्हिडीओचा उल्लेख केला ज्यामध्ये अभिनेत्री निहारिका कोनिडेलासोबतच्या त्याच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले गेले. एका युजरने लिहिले की, निहारिकाच्या व्हिडीओवर झालेल्या टीकेनंतर वागण्यात बदल होईल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. राघवेंद्र राव हे तेलगू चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठे चित्रपट दिले आहेत, परंतु अशा घटनांमुळे ते वादात सापडतात.





