सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्यामुळेच आईचा मृत्यू झाला”, बॉबी डार्लिंगचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “तिचे दागिने चोरुन…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 8, 2025 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bobby darling on mother

“माझ्यामुळेच आईचा मृत्यू झाला”, बॉबी डार्लिंगचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “तिचे दागिने चोरुन...”

कलाकाराची एखादी भूमिका आवडली की, प्रेक्षक त्याला डोक्यावर उचलून धरतात. काही काळापूरता त्यांना प्रसिद्धी मिळते, तर काही कायमस्वरुपी प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे बॉबी डार्लिंग. पाखी शर्माच बॉबी डार्लिंग म्हणून बॉलिवूडमध्ये नावारुपाला आली. हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र काही काळापासून ती कुठे दिसेनाशीच झाली. बॉबीने आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉबीच्या आईचं निधन झालं. मात्र आईच्या निधनाला ती स्वतःलाच जबाबदार ठरवत आहे. यामागचं तिने कारणंही सांगितलं. (bobby darling on mother)

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत बॉबीने तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. बॉबी म्हणाली, “आई माझी चुकी झाली. मला कोणीच समजून घेतलं नाही. तुही मला समजून नाही घेतलं. मी करु तरी काय?. तू तर आता वरती गेलीस. मी इथेच राहिले. एकटीनेच संपूर्ण जगाचा सामना करत आहे. एकटीच सगळ्यांशी लढत आहे. देवाने मला असं का बनवलं?. माझी चूक तरी काय होती?. मला खूप दुःख होतं. माझ्या आईच्या मृत्यूला मीच कारणीभूत आहे. आईचे दागिने घेऊन मी घरातूनच पळून गेले होते. चांदणी चौकात जाऊन मी तिचे सगळे दागिने विकले होते”.

आणखी वाचा – “मला हिला जन्मच द्यायचा नव्हता”, भारती सिंहच्या आईचा खुलासा, अभिनेत्रीही रडली, तिसरीही मुलगीच म्हणून…

पुढे बॉबी म्हणाली, “तिचे जे दागिने मी विकले त लग्नातले होते. तेव्हा मला ३० हजार रुपये मिळाले होते. जेव्हा मी परदेशातून परत आले होते तेव्हा तुझा नाश होईल असं आई म्हणाली होती. हे माझ्या वडिलांनीच मला सांगितलं. मुलाला शाप नको देऊस असं वडील सतत आईला म्हणत होते. पण तुझं चांगलं होणार नाही असं आई बोलली. आता बघा अगदी तसंच होत आहे. मी कठीण परिस्थितीमधून जात आहे”.

आणखी वाचा – “माझ्यासाठी अशा गोष्टी तुच्छ”, रितेश देशमुख-प्रीती जिंटाच्या व्हायरल व्हिडीओवर पहिल्यांदाच बोलली जिनिलीया देशमुख, नक्की काय घडलेलं?

“सगळं झाल्यानंतर मी हाँगकाँगला गेले होते. तिथूनच मी आईला फोन केला होता. आई मी ठिक आहे असं तिला कळवलं होतं. मला तिची खूप आठवण येत होती. त्याबाबत मी आईलाही सांगितलं होतं. आईचा मार आणि तिच्या हातच्या जेवणाची मला खूप आठवण येत होती. माझी आई माझ्याच विचारांमध्ये होती. तिची किडनीही खराब झाली. माझ्या दुःखातच माझी आई गेली. तिच्या निधनासाठी फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. मला कृपया माफ कर. मी रोजच मरत आहे. रात्री मला झोप येत नाही. माझ्या वडिलांच्या मी अजिबात जवळ नव्हते. त्यांचा मला रागच यायचा”. बॉबीने तिच्या मनातील खंत बोलून दाखवली.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Ashish Vidyarthi bollywood prayer meet

“प्रार्थना सभेत येऊनही कलाकार...”, आशीष विद्यार्थींनी सांगितलं बॉलिवूडकरांचं काळं सत्य, तिथेच गॉसिप करतात तेव्हा...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.