शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रार्थना सभेत येऊनही कलाकार…”, आशीष विद्यार्थींनी सांगितलं बॉलिवूडकरांचं काळं सत्य, तिथेच गॉसिप करतात तेव्हा…

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 8, 2025 | 3:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashish Vidyarthi bollywood prayer meet

“प्रार्थना सभेत येऊनही कलाकार...”, आशीष विद्यार्थींनी सांगितलं बॉलिवूडकरांचं काळं सत्य, तिथेच गॉसिप करतात तेव्हा...

बॉलिवूड, त्या भोवतालची माणसं, कलाकार मंडळी यांकडे प्रत्येकाचं बारीक लक्ष असतं. प्रत्येक प्रसंगांमध्ये कलाकारांकडे कॅमेरा असतो. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद होतो. पण बऱ्याचदा कलाकार एखाद्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराला जातात तेव्हा अनेक चर्चा रंगतात. कितीह दुःख किंवा जवळची व्यक्ती असली तरी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करुनच कलाकार जातात. दरम्यान अंतिम संस्काराचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर कलाकार भडकतात. मात्र या वातावरणात कलाकारही विचित्र वागत असल्याचं सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी म्हटलं आहे. त्यांनी बॉलिवूड कलाकारांचं काळं सत्य समोर आणलं आहे. (Ashish Vidyarthi bollywood prayer meet)

निर्माते मुकूल आनंद यांचं निधन झाल्यानंतर आशीष अंतिम संस्काराला गेले होते. यावेळी त्यांना वेगळाच अनुभव आला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आशीष म्हणाले, “मी चित्रपटसृष्टीमध्ये नवीनच होतो. मुंबईमध्ये मी कोणत्या प्रार्थनासभेमध्ये गेलो नव्हतो. जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हा सगळ्यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. मला काहीतरी विचित्रट वाटत होतं. कारण मी एकट्यानेच वेगळ्या रंगाचे कपडे घातले होते”.

आणखी वाचा – “मला हिला जन्मच द्यायचा नव्हता”, भारती सिंहच्या आईचा खुलासा, अभिनेत्रीही रडली, तिसरीही मुलगीच म्हणून…

View this post on Instagram

A post shared by Ashish Vidyarthi (@ashishvidyarthi1)

पुढे ते म्हणाले, “जेव्हा मी तिथून बाहेर आलो तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी हात जोडले आणि नमस्कार केला. त्याचदरम्याने एका व्यक्तीने मला हाताने इशारा केला आणि म्हणाला, खूप दुःख आहे. पण आता पुढील आठवड्याच्या कामाच्या तारखांचं बघुयात का?”. हे ऐकून तर आशिष यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी त्या व्यक्तीसमोर हात जोडले आणि हावभावानेच जे बोलायला पाहिजे होतं ते उत्तर दिलं.

आणखी वाचा – “माझ्यामुळेच आईचा मृत्यू झाला”, बॉबी डार्लिंगचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “तिचे दागिने चोरुन…”

पुढे आशीष म्हणाले, “इथे काय घडत आहे हेच मला कळत नव्हतं. तुम्ही वैयक्तिक जर एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसाल तर तुम्हाला त्याचं दुःख होत नाही. व्यवसायातील एक व्यक्ती म्हणूनच तुम्ही दुःख व्यक्त करता. अशा सभांमध्ये लोक एकमेकांमध्ये बडबड करत असतात”. सोशल मीडियाद्वारेही कलाकार मंडळी श्रद्धांजली वाहतात. त्याबाबतच्या ट्रेंडवरही आशीष यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “आता सोशल मीडियावरही लोक ओम शांती, RIP सहज म्हणतात. त्याखाली एक वाक्य लिहितात की, खूप लवकर गेला. हे खूपच विचित्र आहे. समाजाला आपल्याकडे ज्या नजरेने पाहायचं आहे त्याचं नजरेने तो आपल्याला पाहतो”.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
sanjeev seth lataa saberwal divorce

“वाईट झालं, रडत बसून...”, १५ वर्षांनंतर बायकोपासून विभक्त होताच संजीव सेठ यांचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाले, “जे काही झालं ते...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.