शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कलाकारांमध्ये खोटेपणा असतोच आणि…”, संजय मोने यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “खोटेपणा करुन पैसा मिळवणं हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 29, 2023 | 4:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sanjay mone on Jitendra joshi

“कलाकारांमध्ये खोटेपणा असतोच आणि...”, संजय मोने यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “खोटेपणा करुन पैसा मिळवणं हा...”

झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये सुत्रसंचालक अवधूत गुप्ते उपस्थितांना रोखठोक प्रश्न विचारताना दिसतो. आतापर्यंत कलाक्षेत्रातील मंडळींसह काही राजकीय मंडळींनी ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या गेल्या भागामध्ये अभिनेता जितेंद्र जोशी उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची बेधडक उत्तरं दिली. दरम्यान जितेंद्रचे सगळ्यात जवळचे मित्र संजय मोने या मंचावर आले. त्यांनी जितेंद्रबाबत खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या.

संजय मोने यांना “जितेंद्रची सगळ्यात खुपणारी गोष्ट सांगा” असं अवधूत गुप्ते म्हणाला. यावर ते म्हणाले, “जितेंद्रची सगळ्या खूपणारी गोष्ट म्हणजे तो वाहून जातो. वाईट अर्थाने नव्हे पण तो एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला वाहून नेतो. जगातला कोणताच माणूस पूर्णपणे सच्चा नसतो. कलाकारांमध्ये खोटेपणा असतोच असतो. त्याशिवाय तो कलाकार होत नाही. फक्त त्या कलाकारामध्ये खोटेपणाचं प्रमाण जितकं कमी-जास्त असतं तितकं त्याला आपण मोठे मानतो”.

आणखी वाचा – “जो भी होगा, देखा जायेगा,” संतुर जोडी नारकर कपलचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “नारकर साहेब…”

“खोटेपणा करुन पैसा मिळवणं हा कलाकाराचा व्यवसाय आहे. त्यामुळे कलाकार चलाख असतो. पण जितेंद्र त्यामध्ये वाहून जातो. आम्ही एकदा पुण्यावरुन प्रयोग करुन येत होतो. खूप पाऊस पडत होता. हा घाटामध्ये उतरला आणि म्हणाला मी जातो. मुक्ता बर्वे व आमचे मॅनेजर आमच्याबरोबर होते. मॅनेजर त्याला अडवत होते. पण मी म्हटलं, जितेंद्र तू परवा प्रयोगाला येशील ना?. गाडी पुढे गेल्यानंतर मुक्ताने मला विचारलं की, तुमच्यामध्ये काय बोलणं झालं?. मी तिला काही नाही म्हणून उत्तर दिलं”.

आणखी वाचा – “महिनाभर तिच्या पायाला प्लास्टर करण्यात आलं होत…” क्रांतीच्या लेकीला दुखापत, म्हणाली “अजूनही…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

“जितेंद्र  आता उतरुन कुठे जात आहे? असा प्रश्न तिने मला पुन्हा विचारला. मी तिला बोललो तो माथेरानला जात आहे. म्हणजे तो न बोलता मला कळालं होतं. अजून एक गोष्ट मला त्याच्याबाबत खुपते. कुठेतरी आपला अपमान झालेला असतो. तर आपल्या मनात ते असतं. कुठेतरी अपमान केलेल्या व्यक्तीचा हिशोब चुकता करणार हा विचार आपल्या मनात येतो. बहुसंख्य लोक त्यांचा अपमान केलेल्या लोकांना धडा शिकवतात. पण जितेंद्र तसा नाही. चांगलं किंवा वाईट त्याची परतफेड ही झालीच पाहिजे. फक्त चांगलं असून उपयोग नाही. हे असं झालं आहे तरीही मी तुझ्याशी चांगलं वागत आहे हे समोरच्याला जाणवून देणं गरजेचं आहे”. या दोघांमध्ये किती घट्ट मैत्री आहे या मंचावर दिसून आलं.

Tags: jitendra joshimarathi actressmarathi moviesanjay mone
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Rang Maza Vegla goes Off-Air

'रंग माझा वेगळा' मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार, कलाकारांनी शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.