रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“महिनाभर तिच्या पायाला प्लास्टर करण्यात आलं होत…” क्रांतीच्या लेकीला दुखापत, म्हणाली “अजूनही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 29, 2023 | 12:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar Post

"महिनाभर तिच्या पायाला प्लास्टर करण्यात आलं होत…" क्रांतीच्या लेकीला दुखापत, म्हणाली "अजूनही…"

मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर ही कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर क्रांतीचा वावर हा बऱ्यापैकी पाहायला मिळतो. ती नेहमीच तिच्या लेकींचे अनेक व्हिडीओ पोस्ट करत असते. क्रांतीला झिया व झायदा अशा दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कायमच या दोघींचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. बरं पण क्रांतीने अशातच दोन्ही लेकींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. यामध्ये तिच्या एका लेकीला गंभीर दुखापत झाली असल्याचं सांगितलं आहे. (Kranti Redkar Post)

क्रांतीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये तीच्या दोन्ही मुली झिया व झायदा दिसत आहेत. या व्हिडीओत झायदा ही झियाला चालण्यासाठी मदत करत असल्याचं दिसतंय. या व्हिडीओबरोबरच क्रांतीने त्यांच्या शाळेत घडलेला एक किस्साही सांगितला आहे.

क्रांती म्हणाली, “माझी मुलगी झिया हिला दुखापत झाल्याने तिच्या पायाला महिनाभर प्लास्टर करण्यात आलं होतं. आता ते काढलं असून ती चालायला शिकत आहे. ती खूपच धाडसी, संयमी व समजूतदार आहे. पण इथे आमची खरी हिरो ही मिस छबिल वानखेडे आहे, जी सावलीसारखी तिच्या पाठीशी उभी आहे.”

आणखी वाचा – “त्याचे कौतुक झाले पण”, ‘गदर’सारखा सुपरहिट चित्रपट देऊनसुद्धा सनी देओलला मिळत नव्हतं काम, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “मी ‘गदर’ नंतर…”

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

“आम्ही ओपन हाऊससाठी शाळेत गेलो होतो, तेव्हा मला शाळेतील कर्मचारी सांगत होते की, “झायदा किती करते झियासाठी. ती तिची काळजी घेते. तिच्या बॅगेतून पुस्तक काढणं ती भरुनही ठेवणं. जर ती वॉशरुमला गेली असेल तर ती बाहेर येईपर्यंत थांबते. तिचा टिफीन उघडून देते. झियाच्या पायाला प्लास्टर होते. पण असे असताना झायदा मात्र तिला प्रत्येक कामात मदत करत होती.”

आणखी वाचा – धर्मेंद्र अन् शबाना आझमींचा किसिंग सीन पाहिल्यावर लेक ईशा देओलने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “ते दोघेही…”

“ओपन हाऊस झाल्यानंतर घरी आलो आणि आम्ही सर्वांनी दोन्ही मुलींसाठी उभे राहून टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले. या कठीण काळात आम्हाला आनंदाने पुढे जाण्यासाठी दिलेल्या सर्व शक्तीसाठी मी देवाचे आभार मानते”, असे क्रांती रेडकरने म्हटले आहे.”

Tags: entertainmentkranti redkarkranti redkar family
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Kajol New Property Price

काजोलच्या नव्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, ऑफिससाठी घेतली इतकी महागडी जागा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.