स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेने मराठी मालिकाविश्वात एक आगळंवेगळं स्थान निर्माण केल आहे. दीपा आणि कार्तिकची ही अनोखी लव्हस्टोरी, शिवाय रंगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन हा महत्वाचा विषय घेतल्याने ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी ठरली आणि टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले आहे. या मालिकेत बरेच ट्विस्ट, त्याचबरोबर १४ वर्षांचा घेतलेला लीप प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. पण, गेल्या ३ वर्षांपासून सुरु असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. (Rang Maza Vegla goes Off-Air)
२०१९ मध्ये सुरु झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केली आहे. मालिकेतील दीपा व कार्तिक यांच्या जोडीसोबतच सौंदर्य, श्वेता, आयेशा, दीपिका, कार्तिकी या सर्वच पात्रे घराघरात पोहोचली असून मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं होतं. पण मालिकेचे कथानक बदलल्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहे. असं असूनही मालिका टीआरपीच्या शर्यतीत कायम होती. मात्र, आता प्रेक्षकांची ही लाडकी मालिका लवकरच निरोप घेणार आहे.
हे देखील वाचा – “कलाकारांमध्ये खोटेपणा असतोच आणि…”, संजय मोने यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “खोटेपणा करुन पैसा मिळवणं हा…”

मालिकेच्या शेवटच्या टप्प्याचे शूट सध्या सुरु असून आज या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. यानिमित्त मालिकेतील कलाकारांनी शूटमधील शेवटच्या दिवसाचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले आहेत. दीपा म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेने “माझ्या नवऱ्याचं लग्न” असं कॅप्शन देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. तर श्वेताच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अनघा अतुलने विठ्ठल रखुमाई यांचा फोटो पोस्ट केला असून ती यात म्हणते, ”प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात आहे, श्वेताचा शेवटचा दिवस.” त्याचबरोबर दीपिका आणि कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या तनिष्का विषे आणि अनुष्का पिंपुटकर या दोघींनी सेटवरील फोटोज शेअर केले आहे.
हे देखील वाचा – ‘लाल सिंह चड्डा’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतर आमिर खानचा नवा चित्रपट येणार, ‘या’ व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम करताना दिसणार

‘रंग माझा वेगळा’ ही मालिका जरी निरोप घेत असली, तरीही प्रेक्षक या मालिकेला कधीच विसरणार नाही. मालिकेच्या माध्यमातून कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करतातच पण पडद्यामागचे किस्से, ट्रेंडिंग रिल्स करत नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. दरम्यान, या मालिकेच्या जागी ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने अभिनेत्री तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. (Rang Maza Vegla goes Off-Air)