शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

संजय लीला भन्साळींच्या बहुचर्चित ‘हिरामंडी’ चित्रपटाची पहिली झलक समोर, अभिनेत्रींच्या लूकने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 1, 2024 | 12:12 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Sanjay leela bhansali Netflix series heeramandi first look revealed sonakshi sinha aditi rao hydari Manisha koirala richa chadha in this series

संजय लीला भन्साळींच्या बहुचर्चित ‘हिरामंडी’ चित्रपटाची पहिली झलक समोर, अभिनेत्रींच्या लूकने वेधलं लक्ष

बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व चित्रपटातील भव्यपणा ही समीकरण अगदी ठरलेलंच आहे. संजय लीला भन्साळी यांनी आजवर त्यांच्या अनेक चित्रपटातून वेगवेगळे विषय मांडले आहेत. संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ‘बाजीराव मस्तानी’, ‘रामलीला’, ‘हम दिले दे चुके सनम’, ‘गंगुबाई काठियावाडी’सारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अशातच त्यांच्या आणखी एका नवीन सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.

संजय लीला भन्साळी आता त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘हिरामंडी’ या सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करत आहे. त्यामुळे या सीरिजबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतीच या बहुप्रतिक्षित ‘हिरामंडी : द डायमंड बझार’ची पहिली झलक चाहत्यांसमोर आली आहे. या सीरिजमध्ये ‘हिरामंडी’ नावाचे एक ठिकाण दाखवण्यात येणार आहे, जे वेश्यांचे क्षेत्र होते आणि ज्यावर त्या राण्यांप्रमाणे राज्य करत होत्या. याचा एक व्हिडीओ समोर आला असून यात या सीरिजमधील अभिनेत्रींचा लूकही पहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix US (@netflix)

आणखी वाचा – मुहूर्त ठरला, मंडप सजला, पाहुणे मंडळीही जमली अन्…; ‘या’ ठिकाणी पार पडणार अजिंक्य-शिवानीचं लग्न, जय्यत तयारी सुरु

‘हीरामंडी’ ही पाकिस्तानातील लाहोरमधील एक वेश्यावस्ती आहे. ज्याला ‘शाही मोहल्ला’ असंही म्हटलं जात होतं. फाळणीपूर्वी या वेश्यावस्तीची देशभरात चर्चा होती. १९४०च्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ही सीरिज असून यात प्रेम, राजकारण फसवणूक याविषयी भाष्य केलं जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा – शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरेचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, लूक अन् खास डेकोरेशनने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

या सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच या सीरिजची पहिली झलक समोर आली आहे. पण अद्याप सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण लवकरच ही सीरिज प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे चाहत्यांना या सीरिजची उत्सुकता लागली आहे.

Tags: Bollywood directorBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsheeramandiottSanjay leela bhansaliओटीटीबॉलीवूड दिग्दर्शकबॉलीवूड बातमीमनोरंजन बातमीसंजय लीला भन्साळीहिरामंडी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Priyanka Chopra And Nick Jonas

प्रियांका चोप्रा व निक जोनासने गहाण ठेवलं १४९ कोटींचे घर?, आर्थिक अडचणींमुळे अस्वस्थ, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.