शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुहूर्त ठरला, मंडप सजला, पाहुणे मंडळीही जमली अन्…; ‘या’ ठिकाणी पार पडणार अजिंक्य-शिवानीचं लग्न, जय्यत तयारी सुरु

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 1, 2024 | 10:43 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ajinkya Nanaware and Shivani Surve wedding will take place at this place see the details

मुहूर्त ठरला, मंडप सजला, पाहुणे मंडळीही जमली अन्...; ‘या’ ठिकाणी पार पडणार अजिंक्य-शिवानीचं लग्न, जय्यत तयारी सुरु

Ajinkya Nanaware And Actress Shivani Surve Engagement : अभिनेता अजिंक्य ननावरे व अभिनेत्री शिवानी सुर्वे यांचा नुकताच साखरपुडा सोहळा संपन्न झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती आणि अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. अजिंक्य-शिवानी यांच्या साखरपुड्याचे काही खास क्षण सोशल मीडियावरशेयर करण्यात आले आहेत. ‘अखेर बंधनात’ असं कॅप्शन लिहित अभिनेत्री शिवानी सुर्वेने साखरपुड्याची पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने साखरपुड्यातील खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिवानी व अजिंक्य हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

शिवानी-अजिंक्य यांनी काल (३१ जानेवारी) रोजी साखरपुडा उरकल्यानंतर आज ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे आणि यासाठी खास मंडपही सजला आहे. अजिंक्य-शिवानी यांचे लग्न निसर्गरम्य ठिकाणी पार पडणार आहे. त्यांच्या लग्नासाठी खास डेकोरेशनही करण्यात आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात गर्द छायेत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. ठाण्यातील येउर हिल्स या ठिकाणी शिवानी-अजिंक्यचा विवाहसोहळा पर पडणार आहे. याचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – एकत्र काम करण्याबाबत निवेदिता सराफ यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आम्हा दोघांना…”

शिवानी-अजिंक्यचा साखरपुडा पार पडल्यानंतर रात्री या दोघांचा हळदी समारंभदेखील पार पडला आहे आणि त्यांच्या या हळदी सोहळ्याला मराठीतील अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. शिवानीने ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे ‘बिग बॉस’मधील माधव देवचक्के, नेहा चितळे, मेघा धाडे आणि अनेक इतर कलाकार मंडळी या हळदी समारंभात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हळदीमध्ये खास डान्सही केला आणि त्यांच्याबरोबर नवरीनेदेखिळो ताल धरला असल्याचे पाहायला मिळाले.

आणखी वाचा – शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरेचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, लूक अन् खास डेकोरेशनने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

दरम्यान, शिवानी-अजिंक्य ही दोघे आज दुपारी विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. गेले अनेक दिवस त्यांच्या चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती आणि अखेर आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे चाहते कमालीचे उत्सुक आहेत.    

Tags: ajinkya nanawareentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentMarathi Entertainment Newsअजिंक्य ननावरेMarathi newsshivani surveमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनशिवानी सुर्वे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Ajinkya Nanaware And Shivani Surve Engagement

Video : …अन् होणाऱ्या बायकोला कोणत्या हातामध्ये अंगठी घालावी हेच अजिंक्य ननावरेला कळेना, शिवानी सुर्वेने पाहुण्यांनाच विचारलं आणि…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.