२ डिसेंबर २०१८ रोजी प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघेही अमेरिकेत शिफ्ट झाल्याचं पाहायला मिळालं. हे जोडपे सध्या लॉस एंजेलिसमध्ये एका भव्य घरात राहत आहेत. आता अलीकडील अहवालानुसार असे समोर आले आहे की, त्याने २० दशलक्ष डॉलर्स (१४९ कोटी रुपये) किमतीचे घर रिकामी केले आहे. (Priyanka Chopra And Nick Jonas)
Reddit वर नुकत्याच आलेल्या पोस्टमध्ये प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी त्यांचे २० दशलक्ष डॉलर्सचे लॉस एंजेलिसमधील घर रिकामे केले असल्याचं समोर आलं आहे. या दाम्पत्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यांना त्यांच्या घराचे भाडे म्हणून प्रत्येक महिन्याला US$100,000 द्यावे लागतात आणि ते ही रक्कम भरण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे घर गहाण ठेवण्यासाठी त्यांनी बँकेकडे धाव घेतली आहे.
प्रियांका चोप्रा तिच्या लॉस एंजेलिसमधील घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे, मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रियांका तिच्या घरातून फोटो शेअर करताना दिसत नाही आहे. गृहप्रवेश झाल्यानंतर त्यांनी त्याच घरात दिवाळीचा सण साजरा केला. होळीच्या दिवशी मित्र व जवळच्या नातेवाईकांना त्यांनी आमंत्रित केले होते. मात्र समोर आलेल्या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
५ जानेवारी २०२१ रोजी प्रियांका चोप्राने इंस्टाग्राम अकाउंटवरुन घराच्या गृह्प्रवेशाचे फोटो शेअर केले होते. पती निक जोनासबरोबर तिने विधीनुसार पूजा केली. यावेळी प्रियांका पारंपरिक अंदाजात दिसली होती. या जोडप्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये US$20 दशलक्ष (रु. १४९ कोटी) मध्ये नवीन एन्सिनो इस्टेट खरेदी केला.