सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तीही पळून गेली अन्…”, भावाच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबाबत भलतंच बोलून गेला सलमान खान, २४ वर्षांच्या संसारानंतर…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 23, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
salman khan on sohail seema divorce

“तीही पळून गेली अन्...”, भावाच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबाबत भलतंच बोलून गेला सलमान खान, २४ वर्षांच्या संसारानंतर...

सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांचं कलाक्षेत्रात योगदान मोठं आहे. त्याचबरोबरीने बॉलिवूडमधील नावाजलेल्या कुटुंबियांपैकी खान कुटुंबियही टॉपला आहे. मात्र बऱ्याचदा कामाबरोबरच सलमान आणि त्याच्या भावांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. सलमान लग्न कधी करणार? हा प्रश्न कायमच त्याला विचारला जातो. इतकंच काय तर त्याच्या गर्लफ्रेंड्स आणि लव्ह लाइफबाबतही अनेक चर्चा रंगतात. त्याची भावंड अरबाज व सोहल खानही खासगी आयुष्यामुळे टॉक ऑफ द टाऊन ठरले. अरबाजने मलायका अरोरासह घटस्फोट घेत दुसरं लग्न केलं. तर सोहल खानचाही तब्बल २० ते २२ वर्षांचा संसार मोडला. सलमानने आता याचबाबत भाष्य केलं आहे. (salman khan on sohail seema divorce)

कपिलचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चं तिसरं सीझन सुरु झालं आहे. याचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. पहिल्या भागामध्ये सलमाननेच हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य केलं. शिवाय लग्न कधी होणार? हे जाणून इतरांना काय करायचं आहे? असं स्पष्ट शब्दांत सलमानने यावेळी सांगितलं. “माझं आयुष्य मस्त चाललंय” असंही तो म्हणाला. सलमानने सोहेल खानचा घटस्फोट आणि त्याच्या पत्नीबाबत भाष्य केलं.

आणखी वाचा – गिरीजा ओकच्या पायाला मोठी दुखापत, रुग्णालयामध्ये उपचार सुरु, उभं राहण्यासाठीही त्रास अन्…

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

सलमानच्या घरी कोणालाही कधीच जेवणासाठी नाही बोललं जात नाही, कोणीही येऊन घरी राहू शकतं. सलमानने त्याचा मित्र आणि फोटोग्राफर अविनाश गोवारिकरचं उदाहरणही दिलं. अविनाशच्या घराची समस्या असताना तो सलमानकडे दोन-अडीच महिने राहण्यासाठी आला. पण सलमानच्या घरात त्याने जवळपास दोन वर्ष काढले. अविनाश तिथून गेलाच नाही. दरम्यान सोहेलचं लग्न झालं होतं.

आणखी वाचा – १५ वर्षांच्या संसारानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं मोडलं लग्न, नवऱ्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय, म्हणाली, “एक गोड मुलगा…”

सोहेलच्या लग्नानंतर अविनाशला रुम खाली करण्यास सांगण्यात आलं. सोहेलने पळून लग्न केलं असल्याचा खुलासा यावेळी सलमानने केला. हा संपूर्ण किस्सा सांगताना सलमान म्हणाला, “सोहेलने पळून लग्न केलं. आता तीही (सोहेलची पूर्वाश्रमीची पत्नी) पळून गेली”. सलमानचं हे बोलणं ऐकून सगळेच पोट धरुन हसू लागले. सोहेल व सीमा सजदेहने आर्य समाज पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर १९९९८मध्ये त्यांनी निकाह केला. सोहेलला दोन मुलं आहेत. २४ वर्षांच्या संसारानंतर २०२२मध्ये सोहेल व सीमाचा घटस्फोट झाला.

Tags: bollywood newsentertainment newssalman khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Vishakha Subhedar On Tushar Ghadigaonkar suicide

"हातात कामं नसताना…", मराठी अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर कलाकारांच्या आर्थिक समस्येबाबत बोलल्या विशाखा सुभेदार, पोस्ट व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.