सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१५ वर्षांच्या संसारानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं मोडलं लग्न, नवऱ्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय, म्हणाली, “एक गोड मुलगा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 23, 2025 | 10:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Lataa Saberwal divorce

१५ वर्षांच्या संसारानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं मोडलं लग्न, नवऱ्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय, म्हणाली, “एक गोड मुलगा...”

गेल्या काही वर्षांमध्ये विवाहित जोडप्यांमधील वाद, घटस्फोटाचं प्रमाण अधिक वाढलं असल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर कलाक्षेत्रातही हिच परिस्थिती पाहायला मिळते. अगदी १५ ते २० वर्षांचा संसार सोडून घटस्फोट घेणारे कलाकारही आहेत. आता अशाच एका अभिनेत्रीने तिच्या घटस्फोटाबाीने तिच्या ङटस अभिनेत्रीने घटस्बत घोषणा केली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री लता सभरवालने सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत वैवाहिक आयुष्याबाबत माहिती दिली. लग्नाच्या तब्बल १५ वर्षांनंतर तिने पती संजीव सेठपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. लताने घेतलेला हा निर्णय सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. तसेच तिची पोस्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. (Lataa Saberwal divorce)

१५ वर्षांचा संसार केल्यानंतर घटस्फोट घेण्याची वेळ का आली? याबाबत अद्यापही तिने मौन कायम राखलं आहे. फक्त इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पोस्ट करत तिने संजीवपासून दूर होत असल्याचं सांगितलं. लता म्हणाली, “खूप काळ शांत बसल्यानंतर मी हे घोषित करते की, मी (लता सभरवाल) पती (संजीव सेठ) पासून वेगळी झाली आहे. मला एक गोड दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते”.

आणखी वाचा – ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पुढे लता म्हणाली, “त्याच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देते. माझ्या कुटुंबाचा सन्मान करण्याची मी सगळ्यांना विनंती करते. आमच्या शांतीपूर्ण आयुष्याचा सन्मान करा. यापुढे याबाबत मला काहीच विचारु नका किंवा फोनवरुनही कोणतचे प्रश्न विचारु नका”. लता यांची पोस्ट पाहून चाहतेही हैराण झाले. सोशल मीडियाद्वारे विविध कमेंट करत नेटकऱ्यांनी लताला प्रश्न केले.

आणखी वाचा – कचऱ्यात फेकलेल्या मुलीचं नशीब चमकलं, मिथुन चक्रवर्तींनी उचलून घरी आणलं अन्…; दत्तक मुलगी दिशा चक्रवर्ती आता काय करते?

नक्की काय झालं? तुम्ही एकत्र खूप छान दिसत होतात, आम्ही तुमचे इन्स्टाग्रामवर व्लॉग बघत होतो, गेल्या काही दिवसांमध्ये नक्की काय सुरु आहे?, तुम्ही व्हिडीओमध्ये खूप मस्त दिसत होता, हे ऐकून खूप वाईट वाटलं, आम्ही तुम्हाला आदर्श जोडपं म्हणायचो. अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवरच लता व संजीव यांच्या नात्याला सुरुवात झाली. २०१०मध्ये त्यांनी थाटामाटात लग्न केलं. संजीवचं पहिलं लग्न रेशम टिपणीसबरोबर झालं होतं. आता हा त्याचा दुसरा घटस्फोट आहे.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Tushar Ghadigaonkar Suicide

"माझ्याकडे येऊन खूप रडला पण…", तुषार घाडीगांवकरच्या जवळच्या मित्राने सांगितलं मृत्यूमागील खरं कारण, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.