शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानने घेतली आई व भाच्यांची भेट, भर गर्दीत त्याच्या एका कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 24, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Salman khan seen kiss his mother with affection and nieces ahil ayat at the celebrity cricket league video viral on social media

सलमान खानने घेतली आई व भाच्यांची भेट, भर गर्दीत त्याच्या एका कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच काहीना काही कारणावरून चर्चेत राहत असतो. टो त्याच्या अभिनयासह सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. त्याच्या अनेक फोटो  व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या आई व भाच्यांवर प्रेम करताना पाहायला मिळत आहे.

नुकताच शारजाहमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) सीझन १०चे आयोजन केले गेले होते आणि या सामन्यात सहभागी होण्यापूर्वी सलमानने त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सलमानने आपल्या आईला व भाच्यांना किस केले. या कार्यक्रमादरम्यान सलमानचा भाऊ सोहेल खान व त्याची बहीण अर्पिताही तिथे उपस्थित होती. या सामन्यापूर्वी त्याने आपली आई व भाच्यांची भेट घेतली.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये सलमानची आई व अर्पिता खान, आयुष शर्माची मुले अहिल व आयत एकत्र बसलेले दिसत आहेत. यावेळी सलमान आपल्या आईजवळ जातो. तिची विचारपुस करतो व त्यानंतर तो आपल्या आईला किसही करतो. यानंतर सलमान आपल्या भाच्यांजवळ जातो. तेव्हा अहिल व आयत हे फ्रेंच फ्राइज खात असताना दोघे सलमानलाही फ्राइज भरवतात. यावेळी तोही त्यांचे लाड करतानाचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – लगीनघाई! पूजा सावंतच्या संगीत समारंभासाठी कलाकार व कुटुंबियांची जोरदार तयारी सुरु, फोटो व्हायरल

सलमान खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून् अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. सलमानचे त्याच्या कुटुंबियांविषयी असलेले प्रेम, तसेच आई व भाच्यांची असलेली काळजी पाहून अनेकांनी त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे.  

आणखी वाचा – लग्नाआधीच गरोदर असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर दिव्या अग्रवाल भडकली, पोस्ट शेअर करत म्हणाली, “नेहमी फालतू बोलण्याची…”

दरम्यान, सलमानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सलमान नुकताच कतरिना कैफ व इमरान हाश्मीबरोबर ‘टायगर ३’ मध्ये दिसला होता. यानंतर आता तो विष्णुवर्धनच्या ‘द बुल’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यांना या चित्रपटाची व त्यातील सलमानच्या भूमिकेची उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: bollywood actorBollywood entertainment newsbollywood newsentertainment newssalman khanSalman Khan Motherबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीसलमान खानसलमान खान आई
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Astad Kale Poem

"रोज कितीतरी माणसं मरत असतात…", भर कार्यक्रमात आस्ताद काळेने सादर केलेली वास्तववादी कविता मनाला स्पर्श करुन गेली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.