रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रोज कितीतरी माणसं मरत असतात…”, भर कार्यक्रमात आस्ताद काळेने सादर केलेली वास्तववादी कविता मनाला स्पर्श करुन गेली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 24, 2024 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Astad Kale Poem

"रोज कितीतरी माणसं मरत असतात…", भर कार्यक्रमात आस्ताद काळेने सादर केलेली वास्तववादी कविता मनाला स्पर्श करुन गेली अन्…

आपल्या दमदार अभिनयामुळे व बेधडक वक्तव्यामुळे कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्ताद अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय घडामोडींबाबतही भाष्य करत असतो. बरेचदा आस्तादने भाष्य केलेल्या या पोस्टमुळे त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. मात्र या ट्रोलर्सला न जुमानता कायमच अभिनेता आपलं स्पष्ट मत मांडण्यात कधीच कचरला नाही. आस्तादने त्याच्या कलेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं वर्चस्व निर्माण केलं. (Astad Kale Poem)

‘अग्निहोत्र’ सारख्या मालिकेतून आस्तादनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनेता घराघरात पोहोचला. आस्तादनं त्याच्या कामातून त्याची वेगळी ओळख निर्माण करत प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयासह आस्तादने त्याची लिखाणाची आवडही जोपसली. आस्ताद हा उत्तम लेखक असून त्याला कविता लिहायलाही आवडतात. बरेचदा तो त्याच्या कविता फेसबुकवरून चाहत्यांसह शेअर करत असतो.

आणखी वाचा – सलमान खानने घेतली आई व भाच्यांची भेट, भर गर्दीत त्याच्या एका कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, व्हिडीओ व्हायरल

अशातच आस्तादने नुकतीच रोहिणी निनावे यांच्या सातवा ऋतू या पुस्तक प्रकाशन सोहळयाला हजेरी लावली होती. यावेळी आस्ताद काळेही उपस्थित होता. दरम्यान, या सोहळ्याला अभिनेत्याने या पुस्तकातील एका कवितेचं वाचन केलं. आत्महत्या करणं योग्य आहे काय? असे या कवितेचं नाव होतं. ही कविता वाचताना आस्ताद भावुक झालेला पाहायला मिळाला. जगण्याची उमेद देणारी ही कविता मनाला स्पर्शून गेली. अतिशय आशयघन असा विषय असलेल्या या कवितेचं साऱ्यांनी कौतुक केलं.

आणखी वाचा – लगीनघाई! पूजा सावंतच्या संगीत समारंभासाठी कलाकार व कुटुंबियांची जोरदार तयारी सुरु, फोटो व्हायरल

आस्ताद त्याच्या कामामुळे जितका चर्चेत राहिला त्याहून जास्त तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. आस्तादनं २०२१मध्ये अभिनेत्री स्वप्नाली पाटीलबरोबर लग्न केलं. ‘बिग बॉस’मध्ये असताना त्यानं त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. स्वप्नालीबरोबर लग्न करण्याआधी आस्तादची एक गर्लफ्रेंड होती.मात्र तिचा फार कमी वयात मृत्यू झाला. तिच्या जाण्याच्या आस्तादला फार मोठा धक्का बसला होता. आस्तादने ‘बिग बॉस’च्या घरात त्याच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटनेबद्दल सांगितलं होतं.

Tags: astad kaleastad kale actorAstad Kale Poemastad kale viral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Kiran Rao On Aamir Khan

"तो खूप बोलतो आणि…", घटस्फोटानंतर आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने सांगितले नवऱ्यामधील दोष, म्हणाली, "अजून १५-२० मुद्दे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.