बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच काहीना काही कारणावरून चर्चेत राहत असतो. टो त्याच्या अभिनयासह सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. त्याच्या अनेक फोटो व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या आई व भाच्यांवर प्रेम करताना पाहायला मिळत आहे.
नुकताच शारजाहमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) सीझन १०चे आयोजन केले गेले होते आणि या सामन्यात सहभागी होण्यापूर्वी सलमानने त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सलमानने आपल्या आईला व भाच्यांना किस केले. या कार्यक्रमादरम्यान सलमानचा भाऊ सोहेल खान व त्याची बहीण अर्पिताही तिथे उपस्थित होती. या सामन्यापूर्वी त्याने आपली आई व भाच्यांची भेट घेतली.
सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये सलमानची आई व अर्पिता खान, आयुष शर्माची मुले अहिल व आयत एकत्र बसलेले दिसत आहेत. यावेळी सलमान आपल्या आईजवळ जातो. तिची विचारपुस करतो व त्यानंतर तो आपल्या आईला किसही करतो. यानंतर सलमान आपल्या भाच्यांजवळ जातो. तेव्हा अहिल व आयत हे फ्रेंच फ्राइज खात असताना दोघे सलमानलाही फ्राइज भरवतात. यावेळी तोही त्यांचे लाड करतानाचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – लगीनघाई! पूजा सावंतच्या संगीत समारंभासाठी कलाकार व कुटुंबियांची जोरदार तयारी सुरु, फोटो व्हायरल
सलमान खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून् अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. सलमानचे त्याच्या कुटुंबियांविषयी असलेले प्रेम, तसेच आई व भाच्यांची असलेली काळजी पाहून अनेकांनी त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे.
दरम्यान, सलमानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सलमान नुकताच कतरिना कैफ व इमरान हाश्मीबरोबर ‘टायगर ३’ मध्ये दिसला होता. यानंतर आता तो विष्णुवर्धनच्या ‘द बुल’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यांना या चित्रपटाची व त्यातील सलमानच्या भूमिकेची उत्सुकता लागून राहिली आहे.