शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ती सर्व विसरली अन्…”, आईच्या आठवणीत छाया कदम भावुक, अश्रू पुसत म्हणाल्या, “तिला यातलं काही…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 20, 2024 | 11:04 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sairat, jhund fame marathi actress chhaya kadam got emotional for her mother in majjacha adda

"ती सर्व विसरली अन्...", आईच्या आठवणीत छाया कदम भावुक, अश्रू पुसत म्हणाल्या, "तिला यातलं काही..."

‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘न्युड’, ‘रेडू’, ‘सरला एक कोटी’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसह ‘झुंड’ व ‘गंगूबाई काठियावाडी’ अशा बॉलीवूड चित्रपटांत अभिनय करत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे छाया कदम.  विविधारंगी व्यक्तिरेखा आणि त्यातला सशक्त अभिनय यामुळे कोणत्याही भूमिकेत त्या अगदी चोख बसतात आणि छाया कदम ती भूमिका अगदी चोखपणे निभावतातदेखील.

छाया कदम या अभिनय क्षेत्रात अपघाताने आल्या. पण या क्षेत्रात येण्याअगोदर त्यांचा संघर्ष, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले काही आघात, त्यांचे आईशी असलेले नाते यासह त्यांची बॉलिवूडमधील एण्ट्री याबद्दल फारच कमी लोक जाणतात. आणि त्यांच्या याच प्रवासाबद्दल खास गप्पा मारण्यासाठी छाया कदम यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अगदी मनमुरादपणे संवाद साधला.

यावेळी छाया कदम यांना “तुम्ही आजवर केलेल्या अभिनयासाठी तुमच्या आईकडून तुम्हाला कधी कौतुकाची थाप मिळली आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत छाया कदम यांनी असे म्हटले की, “प्रत्येक गोष्ट तुमच्या नशिबात असावी लागते. सुरुवातीला माझ्या आईला यातलं फार काही कळत नव्हतं आणि मी तेव्हा जास्त कामही केलं नव्हतं. मी काम करायला सुरुवात केली, त्यानंतर आई हळूहळू सर्व विसरत चालली होती. तिला काही आठवत नव्हतं. तेव्हा मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. कारण इंडस्ट्रीत माझं कौतुक होत होतं. पण आपल्या माणसाकडून (आईकडून) कौतुकाची थाप मिळत नव्हती. तिचं असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते.

आणखी वाचा – Video : “रात्री उशिराचा प्रवास अन् गझल…”, लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करत आहेत प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन, व्हिडीओ केला शेअर

यापुढे त्या असं म्हणाल्या की, “आईचं आणि माझं नातं हे खूपच खास होतं. इतर मुली लग्न किंवा कामानिमित्त घराबाहेर जातात. पण माझ्या बाबतीत ते झालं नाही. त्यामुळे मी कायम २४ तास तिच्याबरोबर राहायची. लॉकडाउनच्या काळात आम्ही खूप काळ एकत्र घालवला आहे. पण ती हळूहळू गोष्टी विसरायला लागली होती. त्यामुळे त्या काळात मी तिची आई आणि ती माझी बाळ झाली. आज माझी आई हयात नसली तरी ती कायम माझ्याबरोबर आहे हा माझा विश्वास आहे.”

आणखी वाचा – असा पार पडला ‘भागो मोहन प्यारे‘ फेम अभिनेत्रीच्या लेकाचा बारसा, नावाचा खास अर्थ सांगत शेअर केला फोटो

दरम्यान, छाया कदम यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातत मातृशोक झाला होता. छाया कदम यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आईच्या निधनाची बातमी दिली होती. छाया कदम व त्यांच्या आईचे नाते हे खूपच खास होते. त्यामुळे ‘मज्जाच्या अड्ड्या’वर आईबद्दल व्यक्त होताना छाया कदम त्यांच्या आईच्या आठवणीत खूपच भावुक झाल्या असल्याचे पाहायला मिळाले.

Tags: chhaya kadamentertainment newsmajjacha addamarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsछाया कदममज्जाचा अड्डामनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Next Post
Shashank Ketkar New Car

सुप्रसिद्ध अभिनेत्याने खरेदी केली नवीकोरी महागडी कार, पोस्ट शेअर करत म्हणाला, " गाडी दारात आली अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.