झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सरिता मेहेंदळे. या मालिकेत तिने भूताची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी २०२४ रोजी तिला पुत्ररत्न प्राप्ती झाली. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करून आपण आई झाल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. (Sarita Mehendale Joshi On Instagram)
सरिताने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘इट्स अ बॉय’ असं म्हणत एक फोटो शेअर केला होता. तसेच या पोस्टखाली तिने “हे नवीन वर्ष भरभरून आनंद घेऊन आले आहे. लाडक्या तुझे स्वागत आहे” असं म्हटलं होतं. अशातच सरिताच्या लाडक्या लेकाचा बारसा पार पडला असून लेकाचे हटके नाव ठेवले आहे. तसेच या नावाचा अर्थही सांगितला आहे.
सरिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिचा हात मुलाच्या हातात धरलेला खास फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोमध्ये तिच्या बाळाच्या हातात अन्वीत नाव लिहलेलं ब्रेसलेटही पाहायला मिळत आहे. सरिताने लाडक्या लेकाचे नाव ‘अन्वीत’ असं ठेवलं असून ‘अन्वीत’ या नावाचा अर्थ म्हणजे शौर्य व नेतृत्व असल्याचेही तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे.
दरम्यान, सरिताने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच अभिनेत्रीला शुभेच्छादेखील दिल्या आहेत. आजवर अनेक मालिका व नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘कन्यादान’ व ‘सरस्वती’ यांसारख्या तिच्या मालिका या लोकप्रिय होत्या.