मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सतत तिचे फोटोज् आणि व्हिडिओज तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करते. तिच्या फोटोशूटची नेहमीच चर्चा होत असून चाहते त्यावर विविध प्रतिक्रिया देत असतात. कधीकधी तिच्या पोस्टवर काही नेटकरी तिला ट्रोलदेखील करतात. मात्र, तीसुद्धा ट्रोलर्सच्या कमेंट्सला सडेतोड उत्तर देत असते. अशातच तिने नुकतंच एक रील शेअर केली असून त्या रीलवरील कमेंटला जोरदार उत्तर दिलं आहे. (Sai Tamhankar answered to Trollers on speaking English)
गणेशोत्सवानिमित्त सईने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी तिच्याबरोबर रॅपिड फायर प्रश्नांचा राऊंड खेळण्यात आला. ज्यात तिने ५९ सेकंदात तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, तिने ही सर्व उत्तरे इंग्रजीमध्ये दिल्यामुळे नेटकरी कमेंट्सद्वारे तिला ट्रोल करत आहेत. पण, ट्रोलर्सच्या कमेंटला अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे.
सईने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. ज्यामध्ये ती मोदक खाताना दिसते. हे करत असताना तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसते. मात्र तिला हे सर्व प्रश्न इंग्रजीत विचारण्यात असल्याने तिनेदेखील इंग्रजीतच उत्तरे दिली. नेमकी हीच बाब नेटकऱ्यांना खटकली आणि तिला मराठीमध्ये उत्तरे न देण्यावरून ट्रोल केलं.
हे देखील वाचा – …म्हणून ऋतुजा बागवेने नवीन घरी लावला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो, खुलासा करत म्हणाली, “सकाळी उठल्यावर…”
एका नेटकऱ्याने “मराठीमध्ये बोलली असतीस तर काय झालं असतं? तुला मराठीत बोलायला लाज वाटते का?” अशी कमेंट करत तिला ट्रोल केले खरे. पण त्यावर सईने उत्तर देत चांगलेच खडसावले. “हे एक इंग्रजी चॅनेल आहे. आधी तुम्ही नीट माहिती मिळवा मगच बोला. आणि आम्ही कोणत्या भाषेत बोलायचं हे ठरवण्याचा हक्क तुम्हाला नाही.”, अशी कमेंट करत तिने ट्रोलर्सना खडेबोल सुनावले. तिच्या या उत्तरावर तिच्या चाहत्यांसह अनेकांनी सहमती दर्शवली आहे. सईला आज देशभरातील लोक ओळखत असून एका इंग्रजी चॅनलमध्ये ती मराठी कशी बोलणार, असं ये यात म्हणाले.
हे देखील वाचा – Video: धनश्रीच्या लेकासाठी दीपाचं खास गिफ्ट; व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने मानले आभार, म्हणाली “ही एक सुंदर…”

सईच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, मराठीसह बॉलिवूड व ओटीटी विश्वात आपलं स्थान निर्माण करणारी सई लवकरच सिद्धार्थ चांदेकरबरोबर ‘श्रीदेवी प्रसन्न’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. शिवाय, ती महाराष्ट्राची हस्यजत्रा कार्यक्रमाच्या शूटिंगमध्येही व्यग्र आहे. नुकतंच तिने मुंबईत आलिशान घर घेतलं असून त्याचीदेखील बरीच चर्चा सुरू आहे.