शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video: धनश्रीच्या लेकासाठी दीपाचं खास गिफ्ट; व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने मानले आभार, म्हणाली “ही एक सुंदर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 3, 2023 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Deepa chaudhari gave special gift to kabir

Deepa chaudhari gave special gift to kabir

मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत धनश्रीने वहिनीसाहेब हे पात्र साकारलं होतं. या भूमिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. यानंतर ती सध्या ‘तू चालं पुढं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेतही धनश्री नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळते. या मालिकेत ती साकारत असलेलं शिल्पी हे पात्र सध्या विशेष गाजत आहे. धनश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकतचं तिने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Deepa chaudhari gave special gift to kabir)

मालिकेत शिल्पी म्हणजेच धनश्री ही अश्विनी(दीपा चौधरी) विरोधात अनेक कटकारस्थानं करताना दिसते. परंतू खऱ्या आयुष्यात धनश्री व दीपा या दोघी अभिनेत्रींमध्ये खूप सुंदर नातं असल्याचं पाहायला मिळतं. अलीकडेच दीपासाठी धनश्रीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. दीपाने धनश्रीच्या मुलासाठी म्हणजेच कबीरसाठी एक खास गिफ्ट आणलं होतं. यावेळीचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर करत तिने दीपाचे आभार मानले.

View this post on Instagram

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

आणखी वाचा – “शाळेत उंचीमुळे…”, ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “हे सुवर्णपदक घेऊन…”

व्हिडिओ शेअर करत धनश्री लिहीते, ‘एके दिवशी आमचं आउटडोर शूट चालू होतं. कबीर मला भेटायला आला कारण शूटवर जाताना मी कबीरला प्रॉमिस केलं होतं की त्याच्यासाठी एबीसीडीचा गेम पाठवून देईन. तो सेट वर आला आणि आमच बोलणं दीपा ताई ने ऐकलं. तिने कधी जाऊन तिथल्या जवळच्या दुकानातून कबीरसाठी तो गेम आणला कळलंच नाही.  तिला खूप आवडतं सगळ्यांना गिफ्ट्स द्यायला. त्यापेक्षा मला असं वाटतं की तिचं हे एक छोटं gesture आहे प्रेम व्यक्त करण्याचं. ते त्या त्या वेळी जमवणं ही एक सुंदर कला आहे’, असं लिहीत तिने दीपाचं कौतुक केलं.  
ती पुढे लिहीते, ‘या abcd सोबत तो इतका खेळला की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं सांगत होता. खूप खूप धन्यवाद दीपा माऊ! गिफ्ट खूप आवडलं आणि त्या ही पेक्षा जास्त तुझं gesture. अशीच राहा’, असं लिहीत तिने कबीरकडूनही त्या गिफ्टसाठी आभार मानले.

View this post on Instagram

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

आणखी वाचा – “भारत को छेडोगे तो…”, कंगना रणौतच्या ‘तेजस’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

बऱ्याच नेटकऱ्यांनी कौतुक करत या व्हिडिओवर कमेंट केले आहेत. एका नेटकऱ्याने, ‘किती गोड. मला पण गिफ्ट्स द्यायला खूप आवडतं’, म्हणत त्या व्हिडिओवर कमेंट केली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘कबीरचे एक्सप्रेशन’ म्हणत इमोजी पाठवत तिने कबीरच्या चेहऱ्यावरील आनंदाबद्दल कमेंट केली आहे.

Tags: deepa chaudharidhanashri kadgaonkarTu chaal pudha
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
The Vaccine War director announcement

'द वॅक्सिन वॉर' चित्रपट पाहणाऱ्यांसाठी विवेक अग्निहोत्रींनी आणली 'ही' ऑफर! सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.