शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटानंतर ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरीच धुमाकुळ घातली आहे. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर एकच नाव गाजत आहे ते म्हणजे किंग शाहरुक खान. तब्बल ४ वर्षांनी शाहरुखने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमबॅक करत पुन्हा एकादा सिद्ध केलं की तो या बॉलिवूडचा किंग का आहे. पण असाही एक काळ होता जेव्हा शाहरुखचं बॉलिवूडवर एक हाती राज्य होतं. यापूर्वीही त्याने एकामागून एक बरेच सुपरहीट चित्रपट दिले आहेत. आजही त्याचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. पण या सुपरस्टार शाहरुख खानसह क्रिकेटचा देवता म्हणजे सचिन तेंडुलकरही एका चित्रपटात झळकणार होता. क्रिकेटच्या मैदानात चौकार, षट्कार मारणारा सचिन एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. पण कोणता होता तो चित्रपट आणि का हुकली सचिनसमोरची बॉलिवूड पदार्पणाची संधी? (Sachin Tendulkar was signed for superhit film)
शाहरुखच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘मोहब्बते’. २३ वर्षे उलटून गेली असली तरी आजही या चित्रपटावर व त्यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या चित्रपटाशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचं खास नातं आहे. ‘यशराज फिल्म’च्या बॅनरअंतर्गत बनलेला हा चित्रपट त्यावेळी खूप गाजला. अमिताभ बच्चन, शाहरुख खान व ऐश्वर्या राय हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. खरंतर हा चित्रपट म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या करिअरची दुसरी इनिंग होती.
आणखी वाचा – “भारत को छेडोगे तो…”, कंगना रणौतच्या ‘तेजस’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित
या चित्रपटात अमिताभ यांच्या मुलीची भूमिका ऐश्वर्या रायने साकारली होती. तर विशेष म्हणजे या कथेत अमिताभ यांच्या मुलाचीही भूमिका लिहीली गेली होती. या पात्रासाठी यश चोप्रा यांनी सचिन तेंडुलकरला घ्यायचं नक्की केलं होतं. सचिनने होकारही कळवला होता. पण चित्रपट निर्धारीत वेळेपेक्षा वाढत असल्याने त्यातील काही भाग व पात्र वगळण्यात आली. त्यामुळे सचिनची या चित्रपटात काम करण्याची संधी हुकली.
‘मोहब्बते’ हा चित्रपट २००० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात शाहरुख, अमिताभ व ऐश्वर्या यांच्यासह जिमी शेरगिल, शमिता शेट्टी, उदय चोप्रा, अमरीश पुरी, अनुपम खेर, अर्चना पूरन सिंह, किम शर्मा हे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. वेगवेगळ्या पात्रांची प्रेमकथा या चित्रपटात पाहायला मिळाली होता. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात.