गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…म्हणून ऋतुजा बागवेने नवीन घरी लावला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो, खुलासा करत म्हणाली, “सकाळी उठल्यावर…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 2, 2023 | 6:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rutuja Bagwe has framed a photo of this special person in her new home

ऋतुजा बागवेने नवीन घरी लावला 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो

Mazya Gharachi Goshta : अनेकांना असं वाटतं की जेव्हा आपण स्वतःच घर घेऊ, तेव्हा त्या घराची सजावट करताना एखादी विशेष वस्तू, प्रतिकृती किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचा फोटो आपल्या घरात असावा. अभिनयाबरोबरच आपल्या ग्लॅमर्स अंदाजामुळे सतत चर्चेत राहिलेली मराठी मनोरंजनविश्वातील गुणी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने जेव्हा स्वतःचे घर घेतले. तेव्हा तिने तिच्या घरातील प्रत्येक सजावटीत विशेष लक्ष दिले होते. लक्ष वेधून घेणारी घराची नेमप्लेट असो, किंवा घरातील सुंदर असे इंटिरियर. ऋतुजाने कमी पैश्यात सुंदर असे घर सजवले आहे. पण तिच्या याच घरातील भिंतीवर एका खास व्यक्तीचा फोटो लागला गेला आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून, अनेक तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता रणबीर कपूर आहे. (Rutuja Bagwe has framed a photo of this special person in her new home)

अभिनेत्री ऋतुजा बागवेने काही दिवसांपूर्वी मुंबईत स्वतःचे घर घेतले. त्याचे फोटोजदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. दरम्यान, ‘इट्स मज्जा’च्या ‘माझ्या घराची गोष्ट’ या कार्यक्रमानिमित्त ऋतुजाने तिच्या या नव्या घराची झलक दाखवली. शिवाय, तिच्या या नवीन घराबद्दल भरभरून बोलली.

हे देखील वाचा – Video: ‘तू चाल पुढं’ मालिकेतील वैरींचा ऑफस्कीन आहे ‘असा’ बॉण्ड, धनश्री काडगावकरच्या लेकाचा व दीपा चौधरीचा व्हिडिओ चर्चेत

ऋतुजाने तिच्या नवीन घराच्या भिंतीवर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा फोटो लावला आहे. नवीन घरातील भिंतीवर रणबीरचा फोटो का लावला? याबाबत ऋतुजाला विचारले असता ती म्हणाली, “रणबीर कपूर हा माझा अत्यंत आवडता अभिनेता. माझं त्याच्यावर प्रेम आहे, असा मला वाटतं. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर त्याचा चेहरा मला दिसावा, म्हणून मी त्याचा फोटो लावला आहे.” याचबरोबर कालपासून घरात आलेल्या प्रत्येक मुलीला ती भिंत आवडत असल्याचेही तिने यावेळी सांगतिले.

हे देखील वाचा – “शाळेत उंचीमुळे…”, ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “हे सुवर्णपदक घेऊन…”

दरम्यान, नाटक व चित्रपटांमध्ये झळकलेली ऋतुजा बागवे तिच्या नवीन घराबरोबरच आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. लवकरच तिचा ‘अंकुश’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर ‘लंडन मिसळ’ चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या वाटेवर असून मोठ्या पडद्यावर तिला पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुरलेले आहेत.

Tags: mazya gharachi ghosta rutuja bagwemazya gharachi gosht itsmajjamazya gharachi goshtaranbir kapoorrutuja bagwe
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्याच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Sai Tamhankar answered to Trollers on speaking English

"मराठीत बोलायला लाज वाटते?" भाषेवरून ट्रोल करणाऱ्यांना सई ताम्हणकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "आम्ही कोणत्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.