Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन चांगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या सीझनने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात कलाकार मंडळींसह सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सनेही एन्ट्री घेतली असून या घरातील प्रत्येक सदस्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या सीझनमध्ये निक्की आणि तिच्या टीमची खूपच चर्चा आहे. निक्की, जान्हवी, अरबाज आणि वैभवनं ‘बिग बॉस’चं घर जणू डोक्यावरच घेतलं आहे. तसंच या टीमला रोखण्यासाठी टीम B मध्ये (अंकिता, पॅडी, डीपी, आर्या) कुणीही सक्षम स्पर्धक नाही. त्यामुळे या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून एखादा नवीन स्पर्धक येण्याबाबत प्रेक्षकांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी कवी मनाचे नेते अशी ओळख असलेल्या अभिजीत बिचुकले यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाईल्ड एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अभिजीत बिचुकले ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात दिसले होते. त्यानंतर त्याला ‘हिंदी बिग बॉस 15’मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अभिजीत बिचुकले येणार असल्यावर स्वत: बिचुकले यांनी भाष्य केलं आहे. अभिजीत बिचुकले यांनी नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात येण्यावर भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – सूरज चव्हाणचं नशिब उजळलं, Bigg Boss Marathi नंतर मराठी चित्रपटामध्ये दिसणार, पोस्टर प्रदर्शित
यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “बिग बॉस मराठीचा १ नंबरचा सीझन कुणालाही माहीत नव्हता आणि म्हणून ‘बिग बॉस’ने दोन नंबरच्या सीझनमध्ये मला नेलं. आजही या शोचे तीन, चार आणि पाच असे सीझन झाले. पण अभिजीत बिचुकले शिवाय मराठी बिग बॉस चालला नाही”. यापुढे त्यांना “या पाचव्या सीझनमध्येही तुम्हाला बोलावतील का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी असं म्हटलं की, “एक लाख टक्के… का नाही बोलवणार?”
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमध्ये अभिजीत बिचुकले हे एकमेव राजकीय नेते होते. अभिजीत बिचुकले घरातील वादामुळे कायमच चर्चेत होते. ‘बिग बॉस मराठी’मुळे अभिजीत बिचुकलेची महाराष्ट्राचा चांगलीच ओळख झाली होती. त्यानंतर हिंदी ‘बिग बॉस’मुळे बिचुकलेला देशात ओळख मिळाली. अशातच आता ते ‘बिग बॉस मराठी ५’मधून पुन्हा एन्ट्री होणार असंल म्हटलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या एन्ट्रीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीलं आहे.